Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशनियमित रेल्वे रद्द नाहीच

नियमित रेल्वे रद्द नाहीच

नवी दिल्ली

रेल्वे विभागाकडून सध्या ज्या गाड्या सुरु आहे, त्या रद्द केलेल्या नाही, अशी माहिती रेल्वे विभागाकडून टि्वट करुन दिली.

- Advertisement -

काही माध्यमांमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत सर्व रेल्वे रद्द झाल्याची बातमी दिली गेली. यामुळे रेल्वे मंत्रालयाने खुलासा करत सध्या सुरु असलेल्या कोणत्याही गाड्या रद्द केल्या नसल्याचे स्पष्टीेकरण दिले आहे.

पूर्व रेल्वेच्या चीफ पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन मॅनेजरच्या नावे जारी करण्यात आलेल्या तथाकथित मेलमुळे सोशल मीडियावर अफवा पसरल्या आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत देशातील सर्व रेल्वे गाड्या बंद राहतील. पण हा मेल बोगस असल्याचे रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे. या प्रकारचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत, असे रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या