रेल्वेचा प्रवास महागणार, वाचा कोणाला किती जास्त मोजावे लागणार पैसे

रेल्वे
रेल्वे

भारतीय रेल्वेने (railway)प्रवास करणे आता महाग होणार आहे. रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी प्रवाशांकडून शुल्क घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. स्थानकांच्या कामांसाठी लागणारा निधी आता तिकिटांवर (railway ticket)अतिरिक्त पैसे आकारून उभारला जाणार आहे. यामुळे प्रत्येक तिकिटामागे १० ते ५० रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहे. या शुल्कला स्टेशन डेव्हलपमेंट फी (station development charges)असे नाव देण्यात आले आहे.

रेल्वे
बुस्टर डोससाठी पात्रता, अटी काय? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

रेल्वेचा प्रवास हा श्रेणीनुसार महाग होणार आहे. प्रत्येक तिकिटामागे १० ते ५० रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. हे शुल्क आकारण्यासंदर्भात रेल्वेने वेगवेगळे नियम निश्चित केले आहेत. यासंदर्भात रेल्वे बोर्डाचे निर्देशक (प्रवासी विपणन) विपुल सिंघल यांनी एक अधिकृत पत्र जारी करुन माहिती दिली. वेगवेगळ्या प्रमाणात ही एसडीएफ म्हणजेच स्टेशन डेव्हलपमेंट फीज आकारली जाणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे उपगनरी रेल्वेच्या विकासासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.

रेल्वे
श्वेता तिवारीच्या साडीवरील फोटोंवर चाहते म्हणाले...

असा महाग होणारा प्रवास

आरक्षण न केलेले प्रवासी - साधारण रेल्वे (सेकेण्ड क्लास) १० रुपये

मेल/एक्सप्रेस रेल्वे (सेकेण्ड क्लास)- १० रुपये

एसी एमईएमयू/डीईएमयू १० रुपये

आरक्षण केलेले मात्र नॉन एसी : सेकेण्ड क्लास २५ रुपये

स्लीपर क्लास साधारण २५ रुपये

स्लीपर क्लास (मेल किंवा एक्सप्रेस) २५ रुपये

आरक्षण केलेले एसी क्लास

एसी चेअर क्लास ५० रुपये

एसी थ्री टीयर/ थ्री एसी इकनॉमी क्लास ५० रुपये

एसी टू टीयर ५० रुपये

एसी फर्स्ट क्लास/ईसी/ईए/एसी विस्टाडोम ५० रुपये

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com