राहूल सोलापूरकर म्हणतात ...राजर्षी शाहु महाराजांच्या कार्याची ऐतिहासिक नोंद तोकडीच

‘मला भावलेले राजर्षी शाहु महाराज’ व्याख्यानात राहुल सोलापूरकर यांची खंत
राहूल सोलापूरकर म्हणतात ...राजर्षी शाहु महाराजांच्या कार्याची ऐतिहासिक नोंद तोकडीच
Kaushik K Shil

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राजर्षी शाहु महाराजांनी (Rajarshi Shahu Maharaj) कला, साहित्य, संगित, नाटक, शिक्षण आदी सर्वच क्षेत्रात भरीव (Substantial work in all areas ) काम केले. राजर्षी शाहु महाराजांनी राजा म्हणुन कधीच निर्णय घेतले नाही. तर सर्व सामान्य माणसाचा (common man's thought) विचार करून निर्णय (decision) घेतले. मात्र इतिहासात (history) राजर्षी शाहु महाराजांच्या (Rajarshi Shahu Maharaj) कार्याची नोंद (Record of work) ही तोकड्या स्वरूपात असल्याची खंत विचारवंत तथा चित्रपट कलावंत राहुल सोलापुरकर (Thinker and film artist Rahul Solapurkar) यांनी व्यक्त केली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आणि जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी सायंकाळी शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात राहुल सोलापुरकर यांचे ‘मला भावलेले राजर्षी शाहु महाराज’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्याख्यानाच्या सुरूवातीला राजर्षी शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

Kaushik K Shil
Kaushik K Shil

यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एल.पी. देशमुख हे उपस्थित होते.

राहुल सोलापुरकर पुढे म्हणाले की, शाहु महाराजांच्या भुमिकेचा अभ्यास करतांना महाराजांच्या अनेक गोष्टींची माहिती जाणून घेता आली. आजकाल ऑनलाईन पध्दतीने डिजिटल स्वरूपात घरपोच सातबारा उतारा देण्यात येत असला तरी, राजर्षा शाहु महाराजांच्या काळात असे कुठलेही तंत्रज्ञान नसतांना 100 वर्षांपूर्वीच घरपोच सातबारा उतारा देण्याची पद्धत सुरू केली होती. राजा म्हणुन राज्य कसे चालवावे, हे राजर्षी शाहु महाराजांच्या कार्यातुन शिकण्यासारखे असल्याचे मत राहुल सोलापुरकर यांनी व्यक्त केले.

व्याख्यानाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com