Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याअदानींच्या मुद्द्यावरून राहुल गांधींची संसदेत खडाजंगी

अदानींच्या मुद्द्यावरून राहुल गांधींची संसदेत खडाजंगी

नवी दिल्ली | New Delhi

सध्या संसदेचे (Parliament) अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरु असून या अधिवेशनात राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना कोंडीत पकडण्यासाठी पूर्ण प्रयत्न केल्याचे दिसून आले. आज झालेल्या चर्चेत राहुल गांधींनी अदानींच्या विषयावरून मोदींच्या धोरणांवर (Modi’s policies) चांगलेच तोंडसुख घेतले.

- Advertisement -

यावेळी राहून गांधी यांनी मोदी आणि अदानी यांची मैत्री सिद्ध करणारे छायाचित्र संसदेत दाखवत मोदींविरोधात दंड थोपटल्याचे दिसून आले. या अधिवेशनात (Parliament Budget Session) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अदानी, महागाई, बेरोजगारी आणि अग्निवीर योजनेवर केंद्र सरकारला धारेवर धरले.

विशेषत:अदानींच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार निशाणा साधला. भारत जोडो यात्रेतील प्रसंगांचे कथन करत राहुल गांधी म्हणाले की, रस्ता कोणी बनवला विचारले तर अदानींचे (Adani Group) नाव समोर येत, हिमाचलचे सफरचंद अदानींच्या नावावर असल्याचे त्यांनी म्हटले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे काय संबंध आहेत? हे देश जाणू इच्छितो, असा सवाल राहुल गांधी यांनी सभागृहात उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले की, अदानी २०१४ मध्ये ६०९ व्या स्थानावर होते. इतक्या कमी कालावधीत ते जगातील श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कसे पोहोचले, खरी जादू तेव्हा सुरु झाली जेव्हा मोदी दिल्लीत आले, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

पुढे ते म्हणाले की, अदानी समूह केवळ ८ ते १० बिझनेस क्षेत्रात आहे, मग त्यांची संपत्ती २०१४ मध्ये ८ अब्ज डॉलरवरुन २०२२ मध्ये १४४ बिलिअन डॉलरवर कशी पोहोचली, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित करत मोदींच्या अडाणी यांच्यावरील कृपादृष्टीकडे देशाचे लक्ष वेधले. तसेच अग्नीवीर योजनेवरुनही सरकारला धारेवर धरले.

ते म्हणाले की, अग्नीवीर योजना ही सैन्याची नाही असे निवृत्त लष्कर अधिकारी सांगत आहेत. अग्निवीर ही योजना अजित डोव्हालांनी आर्मीवर थोपवलेली योजना आहे. तसेच चर्चेदरम्यान राहुल गांधीनी जनतेच्या प्रश्नांची यादीच संसदेत मांडली. भारत जोडो यात्रेतील अनुभवांचे कथन करताना सरकारच्या योजना जनतेसाठी उपयोगी पडत नसल्याचे सांगितले. राष्ट्रपतींच्या (President) अभिभाषणात बेरोजगारी, महागाई हे जनतेच्या संबंधित विषयांचा उल्लेख नसल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. यावेळी ‘भारत जोडो, नफरत छोडो’ या घोषणांनी सभागृह दणाणून निघाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या