
दिल्ली । Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हीराबेन (Heeraben) यांच्या प्रकृती अचानक बिघडली आहे.
बुधवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे अहमदाबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. यूएन मेहता रुग्णालयात (UN Mehta Hospital) त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान राहुल गांधी यांनी ट्वीट केलं असून हिराबेन मोदी यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आई आणि मुलगा यांच्यातील प्रेम हे खूप अमूल्य आहे. मोदीजी, या कठीण काळात माझे प्रेम आणि पाठिंबा तुमच्यासोबत आहे. मला आशा आहे की तुमची आई लवकरच बरी होईल, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
तसेच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनीही ट्विट करून लिहिले की, कठीण काळात पीएम मोदींसोबत. पंतप्रधान मोदींच्या आई लवकर बरे व्हाव्यात.
हीराबेन या गुजरातमधील गांधीनगर येथील रायसन गावात त्यांचा धाकटा मुलगा पंकज मोदी यांच्यासोबत राहतात. हीराबेन यांनी यावर्षीच्या 18 जून 2022 रोजी शंभरी गाठली आहे. आईच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींंनी त्यांची भेट घेतली होती. ज्यानंतर हिराबेन यांच्या शंभरीबाबत चर्चेला बरंच उधाण आलं होतं.