मोठी बातमी! राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण?

मोठी बातमी! राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली | New Delhi

कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) प्रचारादरम्यान केलेले एक वक्तव्य चांगलेच भोवले आहे. या वक्तव्याप्रकरणी सुरत न्यायालयाने (Court of Surat) राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे...

मोठी बातमी! राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण?
माहीम समुद्रातील अनधिकृत बांधकामावर कारवाई; राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचे आदेश

राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या एका प्रचारादरम्यान 'चोरों का सरनेम मोदी क्यो होता हैं' असे वक्तव्य केले होते. राहुल गांधींच्या या विधानामुळे संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान झाल्याचा दावा भाजपचे आमदार पूर्णेश मोदी (Purnesh Modi) यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी न्यायालयात केस दाखल केली होती.

त्यानंतर चार वर्षापूर्वीच्या या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली होती. यानंतर सुरत जिल्हा सत्र न्यायालयाने आज त्यावर निकाल दिला. या प्रकरणात न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवले. त्यानंतर २० मिनिटात राहुल गांधी यांना न्यायालयाने (court) दोन वर्षाची शिक्षा सुनावली. मात्र, लगेच त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे राहुल गांधींना मोठा दिलासा मिळाला आहे. तर शिक्षा झाल्यानंतर आता राहुल गांधी वरील न्यायालयात आव्हान देणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी म्हटले आहे.

मोठी बातमी! राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण?
नगर-पुणे महामार्गावर तीन वाहनाचा विचित्र अपघात

दरम्यान, या सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: न्यायालयात हजर होते. यावेळी राहुल गांधी यांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, माझा हेतू चुकीचा नव्हता. मी जे बोललो ते केवळ एक राजकारणी म्हणून बोललो. मी नेहमीच देशातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत आलो आहे, असे त्यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com