
रायपुर | Raipur
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये (Raipur) काँग्रेसचे (Congress) ८५ वे अधिवेशन संपन्न होत आहे. या अधिवेशनाचा आज (रविवार) शेवटचा दिवस असतांना आपल्या भाषणात राहुल गांधी काय बोलतील याकडे संर्वांचे लक्ष लागून होते. अपेक्षेप्रमाणे आपल्या मनोगतातून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या कारभारावर निशाणा साधला.
यावेळी अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेबाबत ( Bharat jodo yatra) आपले अनुभव कथन केले. ते म्हणाले, 'गेली चार महिने आम्ही भारत जोडो यात्रा पार पाडली. यात्रेदरम्यान आम्ही लोकांशी संवाद साधला आणि खूप काही जाणवलं. मी समोर चालत होतो आणि माझ्या पाठीमागे मोठ्या संख्येने लोकं होते. मला चालताना खूप त्रास होत होता, पण मी हा त्रास कधीच जाणवू दिला नाही.
चार महिने कन्याकुमारी ते श्रीनगर (Kanyakumari to Srinagar) अशी भारत जोडो यात्रा आम्ही काढली. व्हिडिओत तुम्ही माझा चेहरा पाहिला. मात्र आमच्यासोबत लाखो लोकं चालत होते. उन, वारा, पाऊस, थंडी यांची पर्वा न करता लोक भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. भारत जोडो यात्रा मला खूप काही शिकवून गेली. भारत जोडो यात्रेमुळे माझा अहंकार नष्ट झाला असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केले.
मी व्हिडिओ पाहात होतो तेव्हा मला अनेक आठवणी आल्या. तुम्ही सगळ्यांनीही पाहिलं असेल पंजाबमध्ये (Punjab) एक मॅकेनिक येऊन मला भेटला. मी त्याचे हात हातात घेतले त्यानंतर अनेक वर्षांचे त्याचे प्रयत्न, त्याच्या वेदना या मी ओळखल्या, अशाच प्रकारे लाखो शेतकऱ्यांना मी भेटलो. त्यांच्याशी हात मिळवले, त्यांना भेटलो की मला त्यांच्या व्यथा कळत असत असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. अशा भावूक आठवणींना उजाळा देत त्यांनी या अधिवेशनातील भाषणादरम्यान उपस्थितांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला.
तसेच भारत जोडो यात्रेतील अनेक घटनांचा उल्लेख करत, त्यांनी या यात्रेतून खरा भारत देश कळला असल्याले कबुल केले, याबरोबरच आजच्या परिस्थितीत देशाच्या संसदेत बोलू दिले जात नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी समूह यांच्या संबंधांविषयी उल्लेख करत मोदींवर राहुल गांधी यांनी टीका केली.