Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन

पुणे |Pune

बजाज उद्योग समूहाचे सर्वेसर्वां ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे आज पुण्यात (Pune) निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. अनेक दिवसांपासून ते कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते.आज त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली….

- Advertisement -

कोलकात्यातील (Kolkata) एका मारवाडी उद्योजकाच्या कुटुंबात १० जून १९३८ रोजी त्यांचा जन्म झाला होता. १९६५ साली राहुल बजाज यांनी आपल्या पारंपरिक उद्योगाची धुरा हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटोने (Bajaj Auto) मोठी प्रगती केली.

कंपनीची उलाढाल ७.२ कोटींवरून तब्बल १२ हजार कोटींवर पोहोचली. त्यांच्याच कार्यकाळात बजाज कंपनीने दुचाकी विक्रीमध्ये देशातील आघाडीची कंपनी बनण्याचा मान मिळवला.

तब्बल ५० वर्षे त्यांनी उद्योगाचे नेतृत्व केले. त्यानंतर २००५ साली त्यांनी सुपुत्र राजीव बजाज यांच्याकडे उद्योगाची धुरा सोपवली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या