राफेल
राफेल
मुख्य बातम्या

राफेल भारतीय भूमीत दाखल

तब्बल २२ वर्षानंतर भारताच्या ताफ्यात नवीन विमाने

jitendra zavar

jitendra zavar

नवी दिल्ली: New Delhi

शत्रूच्या काळजात धडकी भरवणाऱ्या ३६ पैकी ५ राफेल rafale India फायटर हरयाणातील अंबाला हवाईतळावर आगमन झाले आहे. दुपारी ३.१३ मिनिटांनी राफेल मेघगर्जना करत अंबाला हवाईदलाच्या तळावर दाखल झाले. तब्बल २२ वर्षांनंतर भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात नवीन विमाने दाखल झाली. यापूर्वी १९९७ मध्ये भारताला रशियाकडून सुखाई विमान मिळाले हाेते

राफेल
राफेल

राफेल दाखल हाेताच राजनाथसिंह यांनी सांगितले की, राफेल मुळे भारतीय संरक्षण क्षेत्राच्या इतिहासात एका नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे. भारतीय हद्दीत प्रवेश केल्यानंतर भारतीय हवाईदलाची शक्ती वाढवणाऱ्या या विमानाचा नेत्रदीपक व्हिडिओ संरक्षण मंत्रालयाने आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. राफेलचे स्वागत एयरचीफ मार्शल आरकेएस भदाैरिया व त्यांच्या टिमने केले.

Deshdoot
www.deshdoot.com