Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यारणरणत्या उन्हात करदात्यांच्या महापालिकेत लागल्या रांगा

रणरणत्या उन्हात करदात्यांच्या महापालिकेत लागल्या रांगा

धुळे Dhule । प्रतिनिधी

एप्रिल महिन्यात मालमत्ता कर (Property tax) भरणार्‍या नागरिकांना चालू मालमत्ता करावर दहा टक्के सुट (Ten percent discount) असल्याने कर भरण्यासाठी महापलिकेत (Municipal Corporation) गर्दी होत आहे. कर भरण्यासाठी येणार्‍या नागरिकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची (senior citizens) संख्या अधिक आहे. त्यातच उन्हाचे दिवस असल्याने घशाला सातत्याने कोरड पडते. मात्र, महापालिकेने या करदात्यांसाठी बसण्यासाठी व पिण्याच्या पाण्याची (Water) सोय देखील केलेली नाही. त्यामुळे कर भरण्यासाठी येणार्‍या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. यामुळे नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

- Advertisement -

शहरातील मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी आवाहन केले जात आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत धुळेकर नागरिक महापालिकेत रांगा (Queues) लावून कर भरत आहेत. त्यासाठी महापालिकेच्या नव्या इमारतीत पार्कीगजवळ कर भरण्याची (pay taxes) व्यवस्था केली आहे. या ठिकाणी सावली असली तरी नागरिकांना बसण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था (Arrangement) नाही. त्यामुळे पाण्यावाचून घशाला कोरड पडत आहे.

42 अंश तापमानात (temperature of 42 degrees) तासनतास रांगेत ताटकळत उभे रहावे लागत असल्याने ज्येष्ठांचे प्रचंड हाल होत आहेत. परंतु, या प्रमाणिक करदात्यांकडे लक्ष द्यायला महापालिकेजवळ वेळ नाही. त्यामुळे महापालिका केवळ कर वसूली करण्यापूरताच आहे का? असा संतप्त सवाल नागरिक (senior citizens) उपस्थित करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या