शिक्षण विभागातील प्रश्न मार्गी लागणार : आ.तांबे

उपसंचालक व शिक्षणाधिकार्‍यांसमवेत बैठक
शिक्षण विभागातील प्रश्न मार्गी लागणार : आ.तांबे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वीपासूनच शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर काम करणार्‍या सत्यजीत तांबे यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांबाबत नाशिकच्या विभागीय बोर्ड कार्यालयात शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली. या बैठकीत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील प्रलंबित कामांसंदर्भात चर्चा झाली. ही कामे लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास आ. तांबे यांनी बैठकीनंतर व्यक्त केला.

नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदींचे अनेक प्रश्न दीर्घ काळापासून प्रलंबित होते. यात प्रामुख्याने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या बिलांमधील फरक लवकर मिळावा, शिक्षक पदी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना मानधनावर नियुक्त करण्याऐवजी तरुण शिक्षकांची नियुक्ती करावी, 2017-18 ते 2022-23 या दरम्यानच्या सीएचबी शिक्षकांना मान्यता देणे, कला शाखेसाठीच्या तुकडीतील विद्यार्थ्यांची कमाल संख्या निश्चित करणे, अंशत: अनुदानित कर्मचार्‍यांचे प्रलंबित असलेले शालार्थ आयडी त्यांना देणे, आदी उच्च माध्यमिक विभागाच्या प्रश्नांवरही चर्चा झाली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे अनेक प्रश्न दीर्घ काळापासून प्रलंबित होते. आभार दौर्‍यावेळी या प्रश्नांबाबत मी विविध संघटनांशी चर्चा केली होती. शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी यांच्यासह झालेल्या बैठकीत या सर्वच प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. यापैकी अनेक प्रश्न लवकरच सुटतील, असा विश्वास आ. सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com