Monday, April 29, 2024
Homeजळगाव12 हजारांची लाच घेताना कोतवालासह पंटर जाळ्यात

12 हजारांची लाच घेताना कोतवालासह पंटर जाळ्यात

भुसावळ bhusaval। प्रतिनिधी

शेतजमीन खरेदीनंतर सातबारा उतार्‍यावर शेतकर्‍याचे नाव (Farmer’s Name) लावून देण्याचे काम करून देण्यासाठी 15 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 12 हजार रुपयांची लाच स्वीकारताना (accepting a bribe) भुसावळ सजाचे कोतवाल (Kotwal) व त्यांच्या पंटरास (Punteras) लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकार्‍यांची (Anti-corruption department officials) सापळा रचून रंगेहात (Caught red-handed)पकडले आहे. या दोन्ही इसमांविरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई उशिरापर्यंत सुरु होती.

- Advertisement -

अन् प्राजक्ता माळी मिसेस सलमान होता होता राहीली…

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी सन 2022 मध्ये तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथे दोन एकर शेतजमीन विकत घेतली होती. या शेत जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर तक्रादार यांचे स्वतःचे नाव लावण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालय कुर्‍हे पानाचे येथे प्रकरण टाकले होते. या प्रकरणात भुसावळ मंडळ अधिकारी योगिता पाटील यांनी त्रुटी काढून तक्रारदार यांना भुसावळ तहसील कार्यालयाचे कोतवाल कोतवाल रवींद्र लक्ष्मण धांडे (वय 54, रा.भुसावळ) यांना भेटण्यास सांगितले.

पारोळ्यात घरफोडी : एक लाखाचा ऐवज लंपास

तक्रारदार त्यांना भेटले असता सातबारा उतार्‍यावर मंडळ अधिकारी यांच्याकडून नाव लावून आणतो. मात्र त्याच्या मोबदल्यात मंडळ अधिकारी यांचे नाव सांगून 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, तडजोडीअंती 12 हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र लाच देण्याची नसल्याने तक्रारदाराने या संदर्भात एसीबीकडे तक्रार केली.

दि. 18 रोजी पंचासमक्ष सापळा रचून तक्रारदार हे रक्कम घेवून आले असता भुसावळ सजाचे कोतवाल रवींद्र लक्ष्मण धांडे यांच्या इशार्‍यानंतर खाजगी कर्मचारी हरीष देविदास ससाणे (44, रा.आंबेडकर नगर, भुसावळ) यांना 12 हजाराची लाच स्वीकारतांना पंचांसमक्ष जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली. सापळा यशस्वीरित्या रचून ही कारवाई पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारात मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास करण्यात आली. या दोन्ही इसमांविरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई उशिरापर्यंत सुरु होती.

राजस्थानची नंदिनी गुप्ता ठरली ‘ फेमिना मिस इंडिया’

ही कारवाई ला.प्र.वि.जळगावचे पोनि संजोग बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोना बाळू मराठे, पोकाँ प्रदिप पोळ यांच्यासह सहा.फौजदार सुरेश पाटील, हेकाँ अशोक अहिरे, हेकाँ सुनिल पाटील, हेकाँ रविंद्र घुगे, महिला हेकाँ शैला धनगर, पोना जनार्दन चौधरी, पोना किशोर महाजन, पोना सुनिल पाटील, पोकाँ राकेश दुसाने, पोकाँ सचिन चाटे, पोकाँ अमोल सुर्यवंशी, पोकाँ प्रणेश ठाकुर यांनी केली. एसीबीच्या कारवाईनंतर तहसील कार्यालयात प्रचंड खळबळ उडाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या