Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यापंजाबचा बंगळुरूवर विजय

पंजाबचा बंगळुरूवर विजय

शारजा । वृत्तसंस्था

यंदाच्या आयपीएलमधील सर्वात अपयशी ठरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने अखेर विजय मिळवला.

- Advertisement -

त्यांनी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 8 विकेटनी पराभव केला. शारजाच्या छोट्या मैदानावर आरसीबीने प्रथम फलंदाजी करत पंजाबला 172 धावांचे आव्हान दिले होते. पंजाबच्या आघाडीच्या फलंदाजांनी हे लक्ष्य पार केले.

विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबला मयांक अग्रवाल आणि कर्णधार केएल राहुलने धमाकेदार सुरूवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 78 धावांची भागिदारी केली. मयांक 25 चेंडूत 45 धावा करून बाद झाला. त्यानंतर आला ख्रिस गेल मैदानावर आला. दुसर्‍या बाजूला राहुलने या वर्षातील चौथे अर्धशतक पूर्ण केले. ख्रिस गेलने पहिल्याच सामन्यात धमाकेदार खेळ केला. त्याने 36 चेंडूत 50 धावा केल्या आणि आपणच बॉस असल्याचे दाखवून दिले.

अखेरच्या षटकात सामन्यात थोडी उत्सुकता आली होती. पंजाबला अखेरच्या षटकात 2 धावा हव्या होत्या. ख्रिस गेल पहिल्या 3 चेंडूत एक धाव घेता आली. त्यानंतर एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करताना गेल बाद झाला. त्यामुळे त्यांना शेवटच्या चेंडूवर एक धाव हवी होती. निकोलस पूरनने चहलच्या चेंडूवर षटकार मारत विजय मिळवून दिला. त्याआधी नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

देवदत्त पडिक्कल आणि एरॉन फिंच हे चांगली सुरूवात करून देतील असे वाटत होते. पण देवदत्त 18 धावांवर बाद झाला. त्याला अर्शदीपने बाद केले. त्यानंतर कोहली आणि फिंच यांनी संघाला 50च्या पुढे धावसंख्या करून दिली. पण फिरकीपटू अश्विनने फिंचला बाद करत बेंगळुरूला दुसरा धक्का दिला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि विराट यांनी संघाला 100च्या पुढे नेले. सुंदर 13 धावांवर बाद झाला.

त्यानंतर शिवम दुबे देखील 23 धावांवर बाद झाला. गेल्या सामन्यात धमाकेदार खेळी करणार्‍या एबी डिव्हिलियर्सला मोहम्मद शामीने 18व्या षटकात केवळ दोन धावांवर बाद केले. त्याच ओव्हरमध्ये शमीने विराट कोहलीला 48 धावांवर बाद करत आरसीबीला दोन धक्के दिले.

विराट बाद झाला तेव्हा बेंगळुरूची अवस्था 18 षटकात 6 बाद 136 अशी होती. पंजाबच्या गोलंदाजांनी आरसीबीला रोखले होते. पण ख्रिस मॉरिसने 20व्या षटकात शमीला 24 धावा मारत संघाला 171 धावसंख्येपर्यंत पोहोचवले. पंजाबकडून शमी, अश्विन यांनी प्रत्येकी दोन तर अर्शदीप आणि जॉर्डन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

- Advertisment -

ताज्या बातम्या