Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशराजीनामा मागे घेतल्यानंतर सिद्धू यांचा पुन्हा लेटर बाँब, म्हटले...

राजीनामा मागे घेतल्यानंतर सिद्धू यांचा पुन्हा लेटर बाँब, म्हटले…

कॅप्टन अमरिंदर सिंग (captain amrinder singh)यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर पंजाबमधील काँग्रेसमधील संघर्ष संपायला तयार नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Sidhu)यांनी राजीनामा दिला होता. त्यांची मनधरणी करण्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठी यशस्वी झाले असून शनिवारी त्यांनी राजीनामा मागेही घेतला आहे. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Sidhu)यांनी काँग्रेसवर (Congress)निशाणा साधत आपला संघर्ष सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले.

शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन…

- Advertisement -

नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Sidhu)यांनी काँग्रेसच्या (Congress)हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (soniya gandhi)यांना चार पानांचे पत्र लिहिले आहे. यात त्यांनी १३ मुद्द्यांकडे लक्ष वेधलं आहे. यापैकी १२ मुद्दे हे ड्रग्ज, कृषी, वीज, सरकार आणि वीज कंपन्या यांच्यातील करार रद्द करणं तसंच इतर काही गोष्टींमध्ये न्याय मिळावा यांचा समावेश आहे. मागासवर्गीयांचा विकास, रोजगार, सिंगल विंडो सिस्टिम, महिला आणि तरुणांचे सबलीकरण, दारु आणि अवैध खाणकाम याविरोधात कारवाई यावरही त्यांनी लक्ष वेधले आहे. सिद्धू यांनी अशी मागणी केली आहे की, पक्षाने २००७ मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी केलेल्या घोषणांची पूर्तता करायला हवी.

सानिया मिर्झा सोशल मीडियापासून लांब राहणार, कारण…

- Advertisment -

ताज्या बातम्या