आरोग्य विभाग भरती परीक्षा गोंधळ, पोलिसांकडून चौकशी होणार

आरोग्य विभाग भरती परीक्षा गोंधळ, पोलिसांकडून चौकशी होणार
परीक्षा

पुणे:

गेल्या काही दिवसांपासून अकार्यक्षम व्यवस्थापन आणि तांत्रिक गोंधळामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आरोग्य विभागाची (health department)परीक्षा (exam)24 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबर रोजी झाली

परीक्षा
सलमानने सांगितले, त्याची कोट्यावधीची मालमत्ता कोणाला देणार?

महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे गट क आणि गट ड प्रवर्गातील 6205 पदांसाठी ही परीक्षा होती . या परीक्षेपूर्वीचं पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. आता एमपीएससी समन्वय समिती पुणे यांच्याकडून सायबर पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाकडून भरती प्रक्रिया राबवण्याचं काम न्यासा या कंपनीला देण्यात आलं होतं. आरोग्य विभागाच्या भरतीमधील गोंधळाची पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. एमपीएससी समन्वय समितीनं पुणे सायबर विभागात तक्रार देण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून फुटलेल्या व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिकेची तपासणी करायला सुरुवात कऱण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com