काय त्यांची अ‍ॅक्शन, काय त्यांचे नृत्य! शरद पवारही इं​​​​​​​दुरीकर महाराजांच्या किर्तनाचे फॅन

काय त्यांची अ‍ॅक्शन, काय त्यांचे नृत्य! शरद पवारही इं​​​​​​​दुरीकर महाराजांच्या किर्तनाचे फॅन

पुणे | Pune

पुणे आपल्या तडफदार शैलीत, आणि कीर्तनाच्या वेगळ्या अंदाजात जनसागराला पोट धरून हसवणाऱ्या इंदोरीकर महाराजांचे कीर्तन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही आवडते.

मात्र संसदेच्या अधिवेशनाला जावं लागणार असल्यानं त्यांना इंदोरीकर महाराजांचे कीर्तन ऐकता येणार नाही. म्हणून कार्यक्रमातल्या भाषणातला समारोप करताना शरद पवारांनी आपली खंत जाहीरपणे बोलून दाखवली. पण इंदोरीकर महाराजांच्या किर्तनाचा लाभ पुन्हा घेतल्याशिवाय राहणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

काय त्यांची अ‍ॅक्शन, काय त्यांचे नृत्य! शरद पवारही इं​​​​​​​दुरीकर महाराजांच्या किर्तनाचे फॅन
'जिरवा जिरवी'च्या राजकारणात 'बळीराजा'चीच जिरली

पुण्यात एका कार्यक्रमात इंदोरीकर महाराजांचे कीर्तन होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शरद पवार उपस्थित होते. दिल्लीमध्ये उद्या सकाळी अधिवेशन सुरू होत आहे. हिवाळ्याच्या वातावरणामुळे सकाळचे फ्लाईट कॅन्सल होतात. म्हणून घाईगर्दीत मला आताच निघावं लागेल. नाही तर मला इंदोरीकर महाराजांचं कीर्तन ऐकायची इच्छा होती. त्यांच्या कीर्तनामध्ये गमती असतात.

काय त्यांची अ‍ॅक्शन, काय त्यांचे नृत्य! शरद पवारही इं​​​​​​​दुरीकर महाराजांच्या किर्तनाचे फॅन
माता न तू वैरिणी! १५ दिवसांच्या नवजात बाळाला कालव्यात फेकलं अन् केला अपहरणाचा बनाव; मात्र 'असा' लागला सुगावा

मी अनेकदा ते टीव्हीवर पाहात असतो. याची ॲक्शन कर, त्याची दिशा काढ, त्यांची टाळ, नृत्य बदल. आता सगळ्या गोष्टी सांगत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. जनमाणसांमध्ये सहजपणे चांगले संस्कार कसे करता येईल, सहज विचार कसे राबवता येतील? याचं उत्तम उदाहरण कीर्तनकार इंदोरीकर महाराज. आणि याचं लोण महाराष्ट्रमध्ये सामान्य माणसांपर्यंत पोहचलं आहे. आजही याठिकाणी मला त्यांचा कार्यक्रम ऐकण्याची संधी मिळाली नाही. पण त्याचा लाभ मी पुन्हा घेतल्याशिवाय राहणार नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.

काय त्यांची अ‍ॅक्शन, काय त्यांचे नृत्य! शरद पवारही इं​​​​​​​दुरीकर महाराजांच्या किर्तनाचे फॅन
खा. विखेंसमोरच कार्यकर्त्यांचा तुफान राडा; श्रीगोंद्यात नेमकं काय घडलं?

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com