Pune Accident : पुण्यातल्या नवले ब्रिजवरचा अपघात 'ब्रेक फेल'मुळे नव्हे तर...

Pune Accident : पुण्यातल्या नवले ब्रिजवरचा अपघात 'ब्रेक फेल'मुळे नव्हे तर...

पुणे | Pune

वाहतूक कोंडीमुळे सातत्यानं चर्चेत असलेल्या पुण्यात रविवारी रात्री विचित्र अपघात झाला. पुणे-बंगळुरू जलदगती महामार्गावरील नवले ब्रिजवर झालेल्या या अपघातात ४८ वाहनांचा चुराडा झाला. रविवारी (20 नोव्हेंबर) रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार अपघातात जखमी झालेल्यांपैकी 7 ते 8 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टँकरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचं बोललं जात होतं. मात्र तपासादरम्यान यामागे दुसरं कारण असल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना झाली नसल्याचं समोर आलं आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर ही माहिती समोर आली आहे. चालकाने उतार असल्याने इंजिन बंद केलं होतं आणि गेअर न्यूट्रल करत ट्रक चालवत होता. पण वेळेवर ब्रेक दाबू न शकल्याने त्याने ४८ गाड्यांना धडक दिली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आज खासदार सुप्रिया सुळे यांनी आज घटनास्थळी जात पाहाणी केली. कंटनेनरचालक मनीलाल यादव याच्यावर गुन्हा दाखल झालेला असून तो फरार आहे. यादव हा मुळचा मध्य प्रदेशचा आहे. त्याच्यावर सिंहगड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com