Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या'या' तारखेला मांडला जाणार राज्याचा अर्थसंकल्प

‘या’ तारखेला मांडला जाणार राज्याचा अर्थसंकल्प

पुणे | प्रतिनिधी Pune

राज्याचा अर्थसंकल्प (State Budget) कधी मांडला जाणार याबाबत महत्वाची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy chief minister ajit pawar) यांनी दिली. ते म्हणाले, 11 मार्च रोजी हा अर्थसंकल्प मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले….

- Advertisement -

ते म्हणाले की, आधी केंद्र सरकारकडून अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. जीएसटीच्या स्वरुपात जे पैसै केंद्र सरकार राज्यांना देत होते, ते यावर्षीपासून बंद करण्यात येणार आहे. कारण सुरुवातीची पाच वर्षे हे पैसे द्यायचे असे ठरले होते.

पण करोनाकाळात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हे पैसै आणखी दोन वर्षे द्यावेत, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याच्या उपस्थितीत उद्या बैठक होईल. त्यांनतर याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

दरम्यान, 28 फेब्रुवारीपासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 1 फेब्रुवारीला संसदेचे अधिवेशन सुरु झाल्यानंतर अर्थमंत्री जो अर्थसंकल्प मांडतील, त्यानंतर प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री, सहकारी यावर चर्चा करतात. त्यातून राज्याला किती सवलती, वेगळ्या योजना राज्यासाठी देता येतील यासंबंधी चर्चा होते असे अजित पवार म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या