ईडीच्या चौकशीला जाण्यापुर्वी एकनाथ खडसे म्हणाले...

ईडीच्या चौकशीला जाण्यापुर्वी एकनाथ खडसे म्हणाले...

मुंबई :

पुण्यातील भोसरी एमआयडी (midc) जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) अमंलबजावणी संचालनालयाच्या (ED ईडी) कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना बुधवारीच ईडीने अटक केली होती. आपण ईडीला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगत ही चौकशी राजकीय हेतूने असल्याचे त्यांनी सांगितले. खडसे ईडीच्या कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ईडीच्या चौकशीला जाण्यापुर्वी एकनाथ खडसे म्हणाले...
बीएचआर पतसंस्था घोटाळा : अटकेच्या भितीने 'त्या' उद्योजकाने ठेवीदारांचे १ कोटी रुपये केले परत

यावेळी खडसे (Eknath Khadse) म्हणाले, ‘गेल्या ८ दिवसांपासून जळगावमध्ये (Jalgaon)‘कुछ होने वाला है’ असा मेसेज फिरत होता. याचा अर्थ कार्यकर्त्यांना याची माहिती होती. राजकीय हेतूने हे सर्व सुरु असून मी याबाबतच्या चौकशीला सामोरे जाणार आहे. मी नेहमीच ईडीला सहकार्य केलं आहे. आजही ज्या प्रश्नांबाबत चौकशी करण्यात येईल त्याबाबत मी उत्तर देणार आहे. ज्या भूखंडाबाबत चौकशी सुरु आहे तो मुळात वादग्रस्त आहे. एमआयडीसीचा भूखंड असल्याचं सांगून अद्याप त्याचा ताबा त्यांच्याकडे नाही. भूसंपादनाची प्रक्रिया एमआयडीसीतर्फे केलेली नाही. आता एमआयाडीसी या जागेवर दावा करत आहे. भूखंडाबाबत मोबदला दिल्याचे एमआयडीसीने दाखवून द्यावं त्यानंतर हा प्रश्न राहणार नाही.’

ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर खडसेंनी आज पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी खडसे काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र त्याअगोदरच प्रकृती बिघडल्याच्या कारणास्तव त्यांची पत्रकार परिषद रद्द केली होती. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे खडसे ईडी चौकशीला जाणार की नाही, याबाबत तर्कवितर्क रंगले होते. परंतु सकाळी अकराच्या सुमारास ते अंमलबजावणी संचलनायच्या कार्यालयात दाखल झाले.

जावायांना बुधवारी अटक

भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना बुधवारी अटक करण्यात आली आहे. १३ तास कसून चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली. यापुर्वी भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यातही ईडीने चौकशी केली होती. दुसरीकडे, “भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीचा तपास हा योग्य दिशेने सुरु आहे. गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर आता स्वतः एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक होण्याची शक्यता आहे” असे मत अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे (Adv Asim Sarode) यांनी व्यक्त केलं आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com