Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! क्रिकेट खेळताना १४ वर्षाच्या चिमुरड्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

धक्कादायक! क्रिकेट खेळताना १४ वर्षाच्या चिमुरड्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

पुणे | Pune

गेल्या काही महिन्यांपासून देशात हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) अनेकाचे मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यासंदर्भातील अनेक धडकी भरवणारे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

- Advertisement -

यामध्ये कुणाचा नाचताना, कुणाचा दांडिया खेळताना, तर कुणाला भर मंडपात हार्ट अटॅक आल्याच्या घटना घडल्या आहेत. तरुणांपासून ते वृद्धापर्यंत कुणालाही हार्ट अटॅक येताना दिसत आहे. आता अशीच काहीशी घटना पुण्यातील (Pune) हडपसर भागात घडली आहे.

निपचीत पडलेली महिला अन् प्रचंड चेंगराचेंगरी! जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला भयावह VIDEO

पुणे (Pune) येथील हडपसर (Hadapsar) परिसरात क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला. तो केवळ १४ वर्षांचा होता. वेदांत धामणगावकर (Vedanta Dhamangaonkar) असे या चिमूकल्याचे नाव आहे.

छेडछाडीमुळे कॉलेज युवतीची आत्महत्या

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तो मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर गेला होता. दरम्यान, त्याच्या छातीत अचानक दुखू लागले आणि तो खाली बसला. उपस्थित मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषीत केले. अवघ्या १४ वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने वानवडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिकूल हवामान व अवकाळीमुळे आंबा पिकावर परिणाम

चुकीची आहार पद्धती, बदललेली जीवनशैली, व्यायाम न केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे म्हटले जाते. मग १४ वर्षाच्या मुलाबाबत असा प्रकार घडावा, हे आश्चर्य आहे. सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये माणूस सतत धावत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढली आहे. यामुळे कोणीही आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही. याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होतो आहे. अगदी कमी वयामध्ये वेगवेगळे आजार होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

Mission No Pendency म्हणत फडणवीसांकडून कामाची आवराआवर… नव्या चर्चांना उधाण

हृदयविकाराची लक्षणे

छातीत दुखणे किंवा अस्वस्थता, श्वास लागणे, मळमळ किंवा उलट्या होणे, घाम येणे, डोके दुखणे आणि एक किंवा दोन्ही हात, पाठ, मान, जबडा किंवा पोटात अस्वस्थता किंवा वेदना यांचा समावेश असू शकतो. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे आढळल्यास, ताबडतोब वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे. उपचार पर्यायांमध्ये रक्ताची गुठळी विरघळण्यासाठी औषधे, अवरोधित धमनी उघडण्यासाठी अँजिओप्लास्टी किंवा अवरोधित धमनीच्या आसपास रक्त वाहून जाण्यासाठी नवीन मार्ग तयार करण्यासाठी बायपास शस्त्रक्रिया यांचा समावेश असू शकतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या