छायाचित्रे : सतीश देवगिरी

नाशिक

पोलिओ लसीकरण मोहिमेंतंर्गत नाशिक जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओची लस आज देण्यात आले. यासाठी जिल्ह्यात एकूण सहा हजार ९५९ बूथ तयार करण्यात आले होते. सकाळी आठ वाजता लसीकरणास सुरुवात झाली.

लसीकरणासाठी ग्रामीण व पालिका क्षेत्रातील चार लाख ५३ हजार ३४३, नाशिक महापालिका क्षेत्रातील एक लाख ९२ हजार ८६९ आणि मालेगाव महापालिका क्षेत्रात एक लाख १९ हजार २०९ बालकांना पोलिओचा डोस दिला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात सहा लाख ६० हजार पोलिओ डोस प्राप्त झाले आहेत.

घरोघरी मोहीम

रविवारी लसीकरण न झालेल्या मुलांसाठी घरोघरी मोहीम राबण्यात येणार आहे. १ फेब्रवारी २०२१ ते ०५ फेब्रवारी २०२१ दरम्यान घरोघरी जाऊन कर्मचारी पोलिओ लस देतील