Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याप्रकाशक, लेखक साहित्य संमेलनात नाशिकचा डंका

प्रकाशक, लेखक साहित्य संमेलनात नाशिकचा डंका

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ (Akhil Bharatiya Marathi Prakashak Sangh) आयोजित तिसर्‍या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनात (Author Publisher Literary Conference) सातारा (satara) येथे विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

- Advertisement -

साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रातील योगदानाबद्दल नाशिकच्या (nashik) ज्योती स्टोअर्सचे वसंतराव खैरनार (Vasantrao Khairnar, Jyoti Stores) यांना जीवनगौरव पुरस्काराने (Lifetime Achievement Award) संमेलनाध्यक्ष रविंद्र गुर्जर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

याचवेळी सुभाषित प्रकाशनाच्या सुभाषित या दिवाळी अंकाला जाहीर झालेला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकांचा प्रथम पुरस्कार संपादक व प्रकाशक सुभाष सबनीस (Editor and Publisher Subhash Sabnis) यांनी स्वीकारला. त्याचप्रमाणे हास्यधमाल या दिवाळी अंकाला द्वितीय पुरस्कार मिळाला. उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कारात (Outstanding Book Production Award) विज्ञानविषयक उत्तेजनार्थ पुरस्कार शब्दमल्हार प्रकाशन, कुमार साहित्याचा उत्तेजनार्थ दिशोत्तमा प्रकाशनाला प्राप्त झाला.

यावेळी व्यासपीठावर विनय हर्डीकर, शिरीष चिटणीस, राजीव बर्वे, अश्विनी धोंडगे, रविंद्र गुर्जर मंगला गोडबोले राजीव बर्वे हे उपस्थित होते. या संमेलनाला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, मसापचे मिलिंद जोशी प्रकाशक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

या दोन दिवसीय संमेलनात विविध परिसंवाद, काव्यसंमेलन, मुलाखत यांचे आयोजन करण्यात आले होते. मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure), आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shrimant Chhatrapati Shivendrasinharaje Bhosale) तसेच महाराष्ट्रातील अनेक प्रकाशक संपादक लेखक तसेच नाशिकच्या वैशाली प्रकाशनाचे विलास पोतदार, ज्योती स्टोअर्सचे वसंतराव खैरनार, सुभाषितचे सुभाष सबनीस, दिशोत्तमाचे पाटील होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या