७ हजार ६४९ ग्रामपंचायतींसाठी 'या' दिवशी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

७ हजार ६४९ ग्रामपंचायतींसाठी 'या' दिवशी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित सुमारे ७ हजार ६४९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी (Grampanchayat Election) प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या (Voting List) १३ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर १८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) गुरुवारी जाहीर केले...

विधानसभा मतदारसंघाच्या ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर १३ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध केल्या जातील.

त्यावर १८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या २१ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

७ हजार ६४९ ग्रामपंचायतींसाठी 'या' दिवशी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी
एकनाथ शिंदेंचे भाषण सुरु अन् लोकांचा BKC ला 'जय महाराष्ट्र', व्हिडीओ व्हायरल

प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. कारण विधानसभेच्या संबंधित तारखेला अस्तित्वात असलेल्या याद्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आहे तशा वापरल्या जातात.

७ हजार ६४९ ग्रामपंचायतींसाठी 'या' दिवशी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी
नाशिकच्या तीन खेळाडूंची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

हरकती आणि  सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागनिहाय यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com