Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानगराध्यक्षांची निवड आता जनतेतून; विधानसभेत विधेयक मंजूर

नगराध्यक्षांची निवड आता जनतेतून; विधानसभेत विधेयक मंजूर

मुंबई | Mumbai

राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेत सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट जनतेतून सरपंच, नगराध्यक्ष निवडीचे विधेयक मांडले आणि ते विधानसभेत (Assembly) मंजूर देखील झाले आहे…

- Advertisement -

सरकारने (Government) हा जो निर्णय घेतला आहे तो असाच घेतला नसून जनतेचे मत जाणून घेऊनच घेतला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले आहे.

आता थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे, बहुमताने विधानसभेत हे विधेयक मंजूर झाले आहे. नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड ही थेट जनतेतून करावी अशी मागणी जनतेचीच होती, आमचा काही अजेंडा नाही असे यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

या विधेकाला विरोधकांनी कडाडून विरोध केला. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार भूमिका मांडली. तसेच महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत औद्योगिक नगरी पंचायत विधेयक 2022 संमत करावे, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला आणि हे विधेयक बहुमताने मंजूर झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या