Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यानिरपेक्ष भावनेतील जनसेवा खरी संपत्ती : गडकरी

निरपेक्ष भावनेतील जनसेवा खरी संपत्ती : गडकरी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

निरपेक्ष भावनेतून केलेली जनसेवा हीच खरी आयुष्यातील संपत्ती आहे. सहकारी बँकेने दुर्बल घटकांसाठी उभारलेले नामको हॉस्पिटल (NAMCO Hospital )हे खरोखरच इतिहासातील आदर्श ठरावे असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी(Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari ) यांनी काढले.

- Advertisement -

नामको चॅरिटेबल ट्रस्ट (Namco Charitable Trust )संचालित नामको हॉस्पिटलमधील श्री प्रकाशजी रसिकलालजी धारिवाल कार्डिअ‍ॅक केअर सेंटरच्या उद्घाटनाप्रसंगी गडकरी बोलत होते. प्रकाश धारिवाल यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, अ‍ॅड. राहुल ढिकले, उद्योजक महेंद्र ओस्तवाल, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील, नामको बँकेचे अध्यक्ष वसंत गिते, माजी आमदार बाळासाहेब सानप, संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, सचिव शशिकांत पारख आदी उपस्थित होते.

1995 ते 2000 दरम्यान महाराष्ट्रात मंत्री असताना नामको हॉस्पिटलचे संस्थापक हुकूमचंद बागमार यांचा जवळून परिचय होता. त्यांनी ग्राहकांची विश्वासार्हता जपली आणि सामाजिक दायित्वाच्या भावनेतून तब्बल सहा कोटी रुपये निधी देऊन या हॉस्पिटलची स्थापना केली. विद्यमान चेअरमन सोहनलाल भंडारी आणि सचिव शशिकांत पारख यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीच्या प्रयत्नांतून त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला. हॉस्पिटलचे हे कार्य असेच पुढे सुरू राहील आणि हजारो रुग्णांचे प्राण वाचतील, अशा शब्दांत गडकरी यांनी रुग्णालयाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मनोगतात दानदाते तथा प्रसिद्ध उद्योजक प्रकाश धारिवाल यांनी संस्थेबद्दल गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, दातृत्व हा मनाचा भाव असला तरीही केलेले दान हे सत्कारणी लागणे अधिक महत्त्वाचे असते. अशा संस्थेला दान दिल्याचा मला मनस्वी आनंद आहे. कार्यक्रमास खजिनदार अशोक साखला, ट्रस्टचे उपाध्यक्ष आनंद बागमार, सहसचिव राहुल जैन-देढिया, विश्वस्त कांतीलाल पवार, बेबीलाल संचेती, सुरेश पाटील, जयप्रकाश जातेगावकर, रवींद्र गोठी, ललित मोदी, अरुणकुमार मुनोत, गौतम हिरण, प्रितिष छाजेड, नंदलाल पारख, संपतलाल पुंगलिया, चंद्रकांत पारख, महेश लोढा आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक सोहनलाल भंडारी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. लक्ष्मीकांत पाठक यांनी, तसेच आभार शशिकांत पारख यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या