विद्यार्थ्यांनी वाटले प्रबोधनाचे सोने

विद्यार्थ्यांनी वाटले प्रबोधनाचे सोने

इंदिरानगर । प्रतिनिधी Indiranagar

येथील सुखदेव प्राथमिक मराठी विद्यामंदिर (Sukhdev Primary Marathi Vidyamandi) शाळेच्या वतीने दसरा सणाच्या (Dussehra festival)पूर्वसंध्येला आपट्याच्या पानांवर मतदार कार्ड-आधार कार्ड लिंक करण्यासंदर्भात जनजागृती करणार्‍या संदेशांचे वाटप करण्यात आले.

बोगस मतदान, मतदारांची ओळख पटवण्यासाठी तसेच मतदार यादीतील नावांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मतदान कार्ड व आधार कार्ड लिंक करणे खूप गरजेचे असून लिंक करण्याची पध्दत ही सोपी असल्याची जनजागृती करण्यात आली. भारतीय निवडणूक आयोग व महाराष्ट्र निवडणुक आयोगाकडून 1 ऑगस्ट 2022 पासून यासंदर्भात जनजागृती व आवाहन करण्यात येत आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी वर्ग व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या प्रयत्नातून राबवित असलेल्या या राष्ट्रीय कार्य मोहिमेत आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून मतदार-आधारची होईल मित्रता, मतदान प्रक्रियेत येईल सुसूत्रता. आधार नोंदणी कशासाठी, बोगस मतदान टाळण्यासाठी. समज,गैरसमज सोडा, आधी मतदारला आधार जोडा. आजी आजोबा आधार लिंकची करा घाई, योग्य बोटावरच लागेल मतदान केल्याची शाई. मतदार राजा जागा हो, आधार लिंकचा धागा हो. आदी जनजागृतीपर संदेशांचे वाटप विद्यार्थ्यांकडून करण्यात आले.

संस्थेचे सरचिटणीस संजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक नितीन पाटील यांच्या संकल्पनेनुसार कामकाज करणारे शिक्षक अनिता अहिरे,योगेश जाधव व कविता पवार यांनी हा उपक्रम राबविला. उपक्रम यशस्वीतेसाठी मनिषा बोरसे,संदीप नागरे,भारती जाधव,रेखा बागुल,जयश्री मोरे, कल्पना केंद्रे,रुपाली सोनटक्के ,प्रांजल चौधरी,पंकज पवार,नम्रता दोंदे,नंदकुमार झनकर,श्रीमंत डंबाळे आदीनी परिश्रम घेतले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com