Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यावेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी जनआक्रोश आंदोलन

वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी जनआक्रोश आंदोलन

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta-Foxconn project) गुजरातला गेल्या प्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे(Shiv Sena leader Aditya Thackeray) आता रस्त्यावर उतरणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. येत्या शनिवारी पुण्यातील तळेगाव ( Pune- Talegaon )येथे हे आंदोलन होणार आहे.

- Advertisement -

शिंदे-फडणवीस सरकारने लक्ष न दिल्याने वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. या प्रकल्पानंतर बल्कड्रग पार्क देखील बाहेर गेले. यामुळे महाराष्ट्राला मिळणारा मोठया प्रमाणातील रोजगार बाहेर गेला. प्रकल्प बाहेर गेल्याने १.५४ लाख कोटींची गुंतवणूक तर महाराष्ट्राने गमावलीच पण १ लाख रोजगार देखील आपण गमावले, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता.

शिंदे-फडणवीस सरकारकडून देखील या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारने काहीच न केल्याने हा प्रकल्प बाहेर गेला असा आरोप भाजप तसेच शिंदे गटाकडून करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजपाने केली आहे.

या पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे हे वेदांत प्रकरणी आंदोलन छेडणार आहेत. युवा सेनेच्या माध्यमातून राज्यात जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या