PUBG Mobile गेम नव्या नावाने, आजपासून नोंदणी सुरु

कशी व कुठे करावी नोंदणी, जाणून घ्या
PUBG Mobile गेम नव्या नावाने, आजपासून नोंदणी सुरु

नवी दिल्ली

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी चीनच्या PUBG या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅपसह अनेक चिनी अ‍ॅप बॅन केले होते. काही दिवसांपूर्वी PUBG Mobile गेम भारतात नवीन कंपनीचा माध्यमातून परतणार असल्याचे सांगण्यात आले होते. आता हा गेम Battlegrounds Mobile India या नावाने पुन्हा भारतीय चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्याची नोंदणी १८ मे पासून सुरु झाली.

PUBG Mobile गेम नव्या नावाने, आजपासून नोंदणी सुरु
Petrol Price: नाशिकमध्ये पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर, आतापर्यंतचा सर्वोच्च दर

कंपनीनं नुकतंच पबजी मोबाईल इंडियाच्या सर्व सोशल मीडिया पेजेसचं नाव बदलले आहे आणि कंपनीनं आता नोंदणी सुरु केली आहे. १८ मे पासून गुगल प्ले स्टोअरवर Battlegrounds Mobile India साठी नोंदणी सुरु झाली आहे. त्यानंतर हा गेम लाँच करण्यात येईल. दक्षिण कोरियन व्हिडिओ गेम डेव्हलपर क्राफ्टनने शेअर केले आहे की PUBG चे नवे नाव बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया (Battlegrounds Mobile India) असे केले आहे.

अशी करा नोंदणी

कंपनीने या गेमसाठीची प्री-रजिस्ट्रेशन लिंक लाईव्ह (https://www.battlegroundsmobileindia.com/) केली आहे. १८ मे पासून युजर्स या लिंकवर जाऊन गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन करतील. युजर्स या गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन करतील तेव्हाच त्यांना याचा फायदा घेता येईल. हे रिवॉर्ड्स केवळ भारतीय युजर्सपुरते मर्यादित असतील. ज्या वापरकर्त्यांना प्री-रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांना Google Play store वर जाऊन प्री-रजिस्ट्रेशन बटणवर क्लिक केल्यानंतर नोंदणी करता येईल. गेम लाँच झाल्यानंतर युजर्स रिवॉर्ड्स क्लेम करु शकतील. हा गेम प्ले स्टोरवर प्री-रजिस्ट्रेशन उलब्ध आहे. तसेच हा गेम विनामूल्य असेल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com