Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासणाच्या तोंडावर पुरेसे धान्य रेशनमधून पुरवा: माकप

सणाच्या तोंडावर पुरेसे धान्य रेशनमधून पुरवा: माकप

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सणाच्या तोंडावर पुरेसे धान्य (grain) रेशनमधून (ration) पुरवा. अशी मागणी करत मार्क्सवादी कम्युनीस्ट पक्षाने (Marxist Communist Party) रेशन कार्ड (Ration Card) धारकांची संख्या कमी करण्यास विरोध केला आहे. 14 सप्टेंबरला त्यासाठी आंदोलन (agitation) केले जाणार आहे.

- Advertisement -

दसरा दिवाळीच्या तोंडावर जनतेला सण साजरा करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांतून पुरेसा गहू (wheat) आणि तांदळाव्यतिरिक्त साखर, तेल, रवा, मैदा, गूळ आदी धान्ये आणि पदार्थ पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिले पाहिजेत, या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (Marxist Communist Party) राज्यव्यापी आंदोलन (agitation) करणार असल्याचा ठराव पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीमध्ये मंजूर करण्यात आला.

पक्षाचे पॉलिट ब्यूरो सदस्य डॉ. अशोक ढवळे (Politburo Member Dr. Ashok stirred) आणि निलोत्पल बसू यांच्या विशेष उपस्थितीत बेलापुर येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य सचिवमंडळ सदस्य कॉ. विजय गाभणे होते. गोरगरिबांनाही दसरा दिवाळी साजरा करण्याचा अधिकार आहे. पण सरकारच्या धोरणामुळे महागाई वाढल्याने गरिबांना सण साजरा करणे मुश्कील झाले आहे.

अशा परिस्थितीत केंद्र सरकारने खाद्यान्नावर जीएसटी लावून महागाईच्या आगीत तेल ओतले आहे. महाराष्ट्रातील जनतेने याला कसून विरोध केला पाहिजे, असे आवाहन पक्षाने केले आहे. सरकारतर्फे तथाकथित स्वेच्छेने रेशनचा अधिकार सोडून देण्याची मोहीम राबवली जात आहे.

रेशन लाभधारकांची संख्या वाढवण्याची गरज असताना सरकार गरिबांच्या डोक्यावरील अन्न सुरक्षेचे छत्र काढून घेऊ पहात आहे, याचा माकप ने तीव्र निषेध केला आहे. या विरोधात आणि वरील मागणीसाठी14 सप्टेंबर रोजी राज्यभरात पक्षाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी आणि तहसिल कार्यालयांवर मोर्चे काढण्यात येणार असून 23 सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयांवर मोर्चे काढण्यात येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या