Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्या‘स्मार्ट सिटी’ सुरू ठेवण्यासाठी प्रस्ताव

‘स्मार्ट सिटी’ सुरू ठेवण्यासाठी प्रस्ताव

नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्मार्ट सिटी कंपनीची( Smart City Company ) मुदत मार्च अखेर संपुष्टात येत असली तरी कंपनीला कायमस्वरुपी सुरु ठेवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला जाणार आहे. या प्रस्तावात कंपनीच्या कामात बदल करताना सल्लागाराच्या भूमिकेत येण्याबरोबरच डेटा बँक व कमांड कन्ट्रोल सेंटरच्या माध्यमातून उत्पन्नाचे साधनांचा पर्याय दिला जाणार आहे.

- Advertisement -

गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी ट्रश स्किमर खरेदी करणे, गोदावरी नदीपात्रातील गाळ काढणे, गोदावरी नदी तीरावर मलवाहिण्या टाकणे, गोदा सुशोभीकरण, होळकर पुलाजवळ छत्रपती संभाजी उद्यान साकारणे, गोदा पार्क, गोदा वॉक, घाट क्षेत्रातील सुशोभीकरण, होळकर पुलाजवळ यांत्रिकी गेट बसविणे आदी कामे सुरु आहेत. त्याचबरोबर गावठाण विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यातील जवळपास रस्ते कॉन्क्रिटीकरणाचे काम पन्नास टक्के पूर्ण झाले आहे. यापुर्वी कालिदास कलामंदिर नूतनीकरण, पंडीत पलुस्कर सभागृहाचे नुतनीकरण, अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका सिग्नल दरम्यान स्मार्ट रस्ता तयार करणे, व्हिक्टोरीया पुलावर रंगीत-संगीत कारंजे बसविणे, वाहतूक बेटांचे सुशोभिकरण, बाळासाहेब ठाकरे शस्र संग्रहालय, कमांड कन्ट्रोल सेंटर उभारणे आदी कामे पूर्ण केली आहेत.

मात्र यशंवत मंडईच्या जागेवर पार्किंग उभारण्याचो प्रकल्प बारगळले आहेत. स्मार्ट सिटी कंपनीला प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जवळपास एक हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला. यात केंद्र सरकार व राज्य सरकारकडून प्रत्येकी अडिचशे कोटी रुपये तर महापालिकेने पाचशे कोटी रुपयांचा निधीचा वाटा अदा केला आहे. आता स्मार्ट सिटी कंपनीची मुदत मार्च महिन्यात संपुष्टात येत आहे. केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून नव्याने मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आल्याने त्याअनुशंगाने देशभरातील स्मार्ट सिटी कंपन्या बंद पडणार आहे.

स्मार्ट सिटी कंपनी हि एक विकासाची संकल्पना आहे. त्यामुळे विकासाचे मॉडेल अबाधित राहण्यासाठी शक्य असेल त्या स्मार्ट सिटी कंपन्या कायम ठेवण्याच्या सुचना आहेत. मात्र त्यासाठी उत्पन्नाच्या साधने निर्माण करून त्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र व राज्य सरकारला सादर करण्याच्या सुचना आहेत. त्यानुसार नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

स्मार्ट सिटी कंपनीची मुदत संपुष्टात येणार असली तरी अन्य उत्पन्नाचे साधन शोधून कंपनी सुरु ठेवण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

– सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी कंपनी.

उत्पन्नाचे मार्ग

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कंपनीमार्फत सध्या सुरु असलेले प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर काम राहणार नाही. त्यानंतर महापालिका, नगरपालिका तसेच शासकीय व निमशासकीय यंत्रणांसाठी सल्लागार संस्था म्हणून काम करणार आहे. सल्लागार संस्थेत तज्ञांची नियुक्ती केली जाईल. त्यांच्या वेतनाचा खर्च भागविण्यासाठी उत्पन्नाचे मार्ग शोधले जाणार आहे. पार्किंगचे स्लॉट भाडे तत्वावर देणे, शहरात बसविण्यात येत असलेल्या सीसीटिव्ही कॅमेयांच्या माध्यमातून कमांड कन्ट्रोल सेंटरकडे प्राप्त होणाया डाटावर दर आकारणे आदींच्या माध्यमातून उत्पन्न मिळवून खर्च भागविण्याचे नियोजन आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या