नाशिक । प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या सत्ता कालावधीत शहरात विविध विकास कामे,नागरी हिताची कामे सुरु होणे ते पुर्ण करण्यासाठी मोठया प्रमाणात निधी खर्च होणार आहे. याकरिता विविध वित्तीय संस्थांमार्फत अल्प दरात 300 कोटींचे कर्ज उभारुन विकास कामे करण्यासंदर्भातील प्रस्ताव सत्ताधार्याकडुन आयुक्तांना देण्यात आला. यासंदर्भातील विनंतीपत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी महापौरांच्या हस्ते आयुक्त कैलास जाधव यांना पाठविले आहे.

महापालिका क्षेत्रात आता पुढील काळात विविध विकास कामे मार्गी लागणार आहे. यासंदर्भात विधी मंडळ विरोधी पक्षनेते फडणवीस यांचे विनंती पत्र महापौर सतिश नाना कुलकर्णी यांनी स्विकारत ते मनपा आयुक्तांना देण्यात येणार आहे. यात नाशिक शहरातील सर्व प्रभागातील नगरसेवकांची अत्यावश्यक विकास कामे करण्यासाठी तीनशे कोटीचे कर्ज काढण्याची मागणी केली असुन तशा सुचना महानगरपालिका आयुक्त व संबंधितांना दिल्या आहे.

केंद्र शासनाने नमामि गंगा या प्रकल्पांतर्गत गंगेचे शुध्दीकरण व परीसर पर्यावरण पुरक होणे साठी कामकाजास सुरवात केली असुन त्याबाबतचा प्रस्ताव सादरीकरण करण्यातआला आहे. त्याच धर्तीवर नमामि गोदा या महात्वाकांक्षी प्रकल्पात गोदावरीचे व तिच्या उपनदया (नासर्डी,नंदिनी,वालदेवी, वाघाडी) यांचे शुध्दीकरण , पुनरुज्जीवन व परिसर पर्यावरण पुरक करणेसाठी मोठया प्रमाणात खर्च अपेक्षित असुन याकरीता केंद्र शासनाचे अर्थ सहाय्य आवश्यक आहे. याकरिता महापौर कुलकर्णी व सर्व पदाधिकार्यांनी हा प्रस्ताव केंद्रीय मंत्री शेखावत यांच्याकडे पाठविला असुन त्यांच्याशी बोलण्याचे व तो प्रस्ताव मंजूर करुन घेण्याचे आश्वासन फडवणीस यांनी दिले.

केंद्र शासनाच्या अमृत योजने अंतर्गत नाशिक मनपाचा पाणी पुरवठा संदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आलेला असुन अमृत योजनेतील निधी संपुष्टात आल्याने मनपाची महत्वाकांक्षी 225 कोटींची पाणी पुरवठा योजना थांबली आहे. या बाबतही केंद्राकडे निधी मिळणे बाबत पाठ पुरावा करणार असल्याचे फडवणीस यांनी मनपा पादधिकार्यांना सांगितले. तसेच मनपाची 500 उदयाने असुन त्यामध्ये मोठी उदयाने ही सर्व सोयीयुक्त विकसीत केल्यास व यात प्राणी संग्राहलयाचा समावेश करण्यासाठी केंद्र शासनाकडुन अर्थ सहाय्य प्राप्त करण्यासाठी देखील फडवणीस हे केंद्राशी बोलणार आहे.

फडणवीस यांनी मनपा पदाधिकार्यांची चर्चा केली. याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे, आ.सिमाताई हिरे, आ. राहूल ढिकले, आ. राहुल आहेर, शहराध्यक्ष गिरीष पालवे, नाशिकचे संपर्कमंत्री जयकुमार रावल, स्थायी समिती सभापती गणेश गिते, सभागृह नेते सतिश सोनवणे, भाजप गटनेते गदीश पाटील, हिमगौरी आडके, पदाधिकारी व नगरसेवक आदी उपस्थित होते.