Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यासाधूग्राम, रिंगरोडसाठी राज्य शासनाला प्रस्ताव सादर

साधूग्राम, रिंगरोडसाठी राज्य शासनाला प्रस्ताव सादर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

येत्या सिंहस्थापूर्वी नाशिकमध्ये रिंगरोड व साधूग्रामसाठी भूसंपादन प्रक्रियेसाठी नाशिक महापालिकेकडून पाथर्डी ते आडगाव या बाह्यवळण व आडगाव ते गरवारे चौक यादरम्यान रिंगरोड तयार करण्याचे नियोजन केले आहे.

- Advertisement -

तपोवन परिसरात साधुग्रामसाठी भूसंपादन करण्याचे प्रस्तावित आहे. या संदर्भातला प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला असून, भूसंपादनाच्या बदल्यात इन्सेंटिव्ह टीडीआर दिला जाणार आहे. राज्य सरकारने प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर भूसंपादन संदर्भात नवीन धोरण महापालिका अमलात आणणार आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027-28 या वर्षात सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. तसेच राज्य शासनानेदेखील सिंहस्थ कुंभमेळा आराखडा तयार करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. त्याअनुषंगाने पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठक घेत संयुक्त विकास आराखडा तयार करणार्या समितीला सूचना दिल्या होत्या.

साधूग्राम तसेच रिंगरोडसाठी जवळपास सव्वाचार हजार कोटी रुपये लागणार आहे. यात सर्वात मोठा भाग भूसंपादनाचा आहे. या संदर्भात महापालिकेने राज्य शासनाला प्रस्ताव सादर केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या