Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यापूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रस्ताव सादर

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रस्ताव सादर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गेल्या आठवड्यात सिन्नर तालुक्यात ( Sinnar Taluka ) झालेल्या अतिवृष्टीमुळे ( Heavy Rain )घरे, टपर्‍या तसेच दुकाने यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना शासनाकडून भरपाई (Government compensation to the victims)देण्यात येणार असल्याने नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्यात आले होते.आज जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून सुमारे 1 कोटी 21 लाखांच्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे.

- Advertisement -

गेल्या गुरुवारी सिन्नरमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका येथील नागरिकांना आणि दुकानदारांना मोठ्या प्रमाणात बसला होता. सिन्नरमधील रहिवासी क्षेत्र आणि बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने स्थानिकांसह व्यावसयिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे वैद्यकीय शिक्षण आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार तातडीने पंचनामे पुर्ण करण्यात येऊन 1 कोटी 21 लाख 85 हजार रूपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला.

नुकसानग्रस्त घरे 195

दुकाने 184

टपर्‍या 111

अनधिकृत घरे ,दुकाने धारकांना मदत

तहसीलदार यांनी तांत्रिक समितीमार्फत नुकसानीची पाहाणी केली तसेच सिन्नर मुख्याधिकारी यांनी देखील अहवाल दिला त्यानुसार 105 घरे, 177 दुकाने आणि 111 टपर्‍या या अतिक्रमित क्षेत्रात असल्याने अनधिकृत ठरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे ते मदतीस पात्र ठरत नाही. तथापी सिन्नर तहसिलदारांनी सादर केलेल्या अहवालानुसार विशेष बाब म्हणून अनुदान देण्याची विनंती केली होती. त्यानुसार मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पाठविला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या