Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याएसटीपी प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी प्रस्ताव

एसटीपी प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी प्रस्ताव

नाशिक । प्रतिनिधी Nashik

बृहन्मुंबई महापालिकेचे अनुभव असलेले रमेश पवार यांची नाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक( NMC Commissioner Ramesh Pawar ) म्हणून राज्य शासनाने नेमणूक केल्यापासून त्यांनी गोदावरी प्रदूषणाच्या ( Godavari Pollution )विषयात विशेष लक्ष दिले आहे.

- Advertisement -

गोदावरी नदीत मिसळणार्‍या नाल्यांची स्वता बोटीत बसून त्यांनी दोन तास पाहणी केली होती. सविस्तर माहीती घेतल्यानंतर सुधारणेसाठी सुचना दिल्या होत्या. तर गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी तात्पुरत्या आणि कायमस्वरुपी अशा दोन्ही स्वरुपाच्या उपाययोजनावर भर देत त्यांनी 400 कोटी खर्चुन गोदावरीत मिसळणार्‍या मलनिस्सारण केंद्र ( STP )अद्यावत करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

नाशिक महापालिका शहरातील तपोवन, टाकळी, चेहेडी आणि पंचक अशा चार एसटीपी प्लॅटचे लवकरच आधुनिकीकरण करणार आहे. त्यासाठी 400 कोटीच्या प्रस्तावाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) झाला असून केंद्रीय संचालनायाच्या मान्यतेनंतर निविदा काढली जाणार आहे. शहरातील तपोवन, टाकळी, चेहेडी आणि पंचक अशा चार मलनिस्सारण केंद्राचे अपग्रेडेशन होणार आहे. सध्या या केंद्रात सांडपाण्यावर प्रक्रिया होते पण त्याचा दर्जा चांगला नाही.

नाशिक शहरात तपोवन, टाकळी पंचक, चेहेडी, गंगापूर, पिंपळगाव, मखमलाबाद आणि कामटवाडे अशा 8 एसटीपी केंद्रातून सांडपाण्यावर प्रक्रिया करुनच ते पाण्याचा पुर्नवापर करण्याचे महापालिका प्रयत्नशील आहे.आयुक्त पवार त्याबाबत गंभीर असल्याचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या