Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरची स्वयंरोजगाराला चालना

नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरची स्वयंरोजगाराला चालना

नाशिक । प्रतिनिधी Nasik

नाशिक इंजिनिरिंग क्लस्टर ही ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर चालणारी स्थापित स्वयंनिर्भर संस्था असून भारतातील सर्वोत्कृष्ट क्लस्टर्स पैकी एक आहे. जिल्हा व विभागातील उद्योगांच्या विकासासाठी मोलाचे योगदान देत आहे.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘शोध नाविन्याचा’ उपक्रमांत तिसरी बॅच नुकतीच लॉन्च करण्यात आली असल्याचे नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे चेअरमन मनिष कोठारी यांनी सांगितले.

- Advertisement -

नाशिक इंजिनिरिंग क्लस्टर स्टार्ट-अप्स व व्यावसायिकांनी आत्मनिर्भर व नोकर्‍या देणारे बनावे यासाठी व केंद्र सरकारच्या स्टार्ट अप इंडिया उपक्रमाद्वारे उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा व नाशिक यशस्वी स्टार्ट अप्स घडविणारे केंद्र बनावे ह्यासाठी प्रोत्साहन देत आहे.भारत सरकारच्या योजना आहेत.ज्यात डीपीआयआयटी मान्यताप्राप्त स्टार्ट-अप्सला अर्थसहाय्य मिळू शकते त्यासाठी त्यांना काही निकषांपर्यंत पोहोचणे आवश्यक असेल. जे स्टार्ट अप्स हे निकष पूर्ण करतील त्यांना विनातारण 45 दिवसांत 20 ते 30 लाख रुपये कामाच्या प्रगतीच्या टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहे. त्यासाठी शासकीय सहाय्यासाठी केवळ नाशिक इंजिनीरिंग क्लस्टरची मंजुरी गरजेची आहे. राज्यातून केवळ आयआयटी मुंबई व नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर या दोनच संस्थांना मान्यता देण्यात आली आहे.

स्किल डेव्हलपमेंट हब हा केवळ उद्योगाभिमुख कुशल मनुष्यबळ विकसित करीत नसून तांत्रिक कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची गुणवत्ता व उत्पादकता वाढविण्यासाठी त्यांचा गुणवत्ता विकास (अपस्किलिंग)केला जातो.डेव्हलपमेंट पार्टनर म्हणून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण बोर्डाचे फॅकल्टी प्रमुख हे काम पहाणार आहेत. उद्योगांचे कार्य सुरळीत व सुरक्षितपणे पार पडावे यासाठी औद्योगिक सुरक्षा ही अतिशय महत्वाची आहे.

जागतिक दर्जाच्या इनोव्हेशन व इन्क्युबेशन सेंटर स्थापन करून नाशिक इंजिनिरिंग क्लस्टरने आपल्या सेवांचा विस्तार उद्योजकांपासून ते स्टार्ट-अप्सपर्यंत केला.त्यासाठी 10 हजार चौरस फूटाचा कक्ष उपलब्ध करुन देण्यात आला आहेे. जिल्ह्यात व विभागात नवनिर्मिती व उद्यमशीलतेला चालना मिळावी. यासाठी कार्यशाळा, बूट कॅम्प्स, वेबिनार्स, सेमिनार्स, उद्यमशीलतेबाबत जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात आली. याव्यतिरिक्त नाशिक इंजिनिरिंग क्लस्टर दरवर्षी ‘इंनोव्हेशन चॅलेंज’ उपक्रमाचे आयोजन करते.

यावर्षी चौथ्यांदा आयोजित होत असलेल्या इनोवेशन चॅलेंज आयडिया स्पार्क उपक्रमात प्रवेश विनामूल्य सर्वांसाठी खुला होता. अधिकाधिक लोकांना यात सहभाग घेण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन केवळ साध्या क्यूआर कोड द्वारे किंवा एनइसीच्या वेबसाईट भेट देऊन नोंदवता येणार आहे.

यावेळी एनईसीचे माजी अध्यक्ष विक्रम सारडा, संचालक नरेंद्र गोलीया, संचालक नरेंद्र बिरार, मुख्य कार्यकारी अध्यक्ष एस के. माथूर उपस्थित होते.

प्रत्येक युवकांमध्ये नाविन्याचा ध्यास घेण्याची ऊर्मी जागणे गरजेचे आहे. त्यासाठी एनइसी काम करणार आहेे. प्रथमत: संकल्पना,प्रोटोटाईप त्यानंतर तीन वेळा पुन्हा प्रयत्न, अंतिम प्रोटोटाईप, टेस्टिंग, वास्तववादी, मार्केटिंग, कंपनीची स्थापना त्यापाठोपाठ पेटेंट या प्रक्रियेत क्लस्टर या उमेदवारासोबत काम करणार आहे. त्यानंतरही सातत्याने आरअ‍ॅण्ड डी केले जाणार आहे.

नरेंद्र गोयल,संचालक , नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर

आज समाजात बदलते वातावरण आहे.लोक ऑनलाइन पद्धतीने काम करीत आहेत.प्रगत तंत्रज्ञानामुळे पतपुरवठादेखील ऑनलाइन पहाता येत असल्याने त्यातील अडसर बाजूला गेले आहेत.युवकांमध्ये नव्या उमेदीचे धैर्य वाढवायचे आहे. आज उद्योग सुरू करण्यात फार अडथळे नसल्याने धोका पत्करला तरच यश मिळणार आहे.

विक्रम सारडा, माजी अध्यक्ष, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर

ग्रामीण भागात ‘उमेद-शोध नावीन्यतेचा’

नाशिक इंजिनिरिंग क्लस्टर व जिल्हा परिषद यांनी संयुक्तपणे नाशिकमधील ग्रामीण भागात नवनिर्मिती व उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘उमेद- शोध नावीन्यतेचा’ हा प्रकल्प नाशिकमधील दिंडोरी, इगतपुरी, नाशिक, निफाड, सिन्नर व त्र्यंबकेश्वर या सहा तालुक्यांमध्ये सुरु केला. या उपक्रमाला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यातील 3 उत्कृष्ट संकल्पनांना नाशिक इंजिनिरिंग क्लस्टरतर्फे रोख पारितोषिके व इन्क्युबेशन सपोर्ट देण्यात आला.ग्रामीण नवउद्योजकांमधील एका उद्योजकाने नाशिक इंजिनीरिंग क्लस्टरद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या पायाभूत सुविधा व पाठबळामुळे आपले उत्पादन कोणत्याही यंत्रणेच्या आर्थिक पाठबळाशिवाय पूर्णतः विकसित केले. संकल्पनेपासून ते उत्पादन बाजारपेठेसाठी सज्ज होण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया 10 महिन्यात पार पडली.

स्ट्राईव्ह प्रकल्प

या प्रकल्पांतर्गत आम्ही भारत सरकारच्या प्रशिक्षण महासंचालक यांच्या सहकार्याने उद्योगांना असलेली मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या कौशल्याला योग्य आकार देऊन त्यांना उद्योगांमध्ये अँप्रेन्टीसशिपची विनाशुल्क संधी उपलब्ध करून देण्यात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या