धर्मांतर बंदी कायदा लवकरच अस्तित्वात येईल - चित्रा वाघ

धुळ्यात पत्रपरिषदेत उध्दव ठाकरे, संजय राऊतांवर साधला निशाणा
धर्मांतर बंदी कायदा लवकरच अस्तित्वात येईल - चित्रा वाघ

धुळे । dhule प्रतिनिधी

मुलींना (girls) लग्नासह विविध प्रकारचे आमिष दाखवून (baiting) पळवून नेण्याच्या (abduct) घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रसंगी त्यांचे धर्मांतर (conversion) केले जाते. त्याला आळा बसण्यासाठी धर्मांतर बंदी कायदा (Prohibition of Conversion Act) आवश्यक असून येत्या हिवाळी अधिवेशनात चर्चा होवून लवकरच कायदा अस्तित्वात येईल, असा विश्वास भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (State President of BJP Mahila Morcha Chitra Wagh) यांनी धुळ्यात पत्रपरिषदेत व्यक्त केला. त्यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि खा. संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधाला.

शहरातील राम पॅलेसमध्ये आज चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यानंतर राज्यभरातील दौर्‍याची माहिती दिली. यावेळी खा.डॉ.सुभाष भामरे, प्रदेश उपाध्यक्ष बबन थोरात, महापौर प्रदीप कर्पे, भाजप महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण अध्यक्ष नारायण पाटील, महिला प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव, जिल्हाध्यक्षा सविता पगारे, महानगर महिला अध्यक्षा मायादेवी परदेशी व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीनंतर चित्रा वाघ या संपूर्ण राज्याच्या दौरा करीत आहेत. आज त्या धुळे दौर्‍यावर आल्या होत्या.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगामी मुख्यमंत्री महिला असेल या वक्तव्यावर बोलतांना प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाले की, महिला मुख्यमंत्री करण्याचा मुद्दा ज्यांनी उपस्थित केला त्यांनी मुख्यमंत्री पदाची आपली हाऊस फिटली. त्यानंतर त्यांना आता महिला मुख्यमंत्री करण्याची आठवण आली आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला. तसेच मुख्यमंत्री पदावर महिला बसली तर आम्हाला आनंदच आहे. पण महिला मुख्यमंत्री झाल्यानंतर महिलांचे सर्वच प्रश्न सुटतील या मताशी मी सहमत नाही. कारण मंत्रीपद सांभाळल्यानंतर त्यांनी सगळ्या जबाबदारीने काम केले, सगळ्या घटकांना न्याय दिला पाहिजे आमचे हेच मत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कर्नाटकची महाराष्ट्रात देखील घुसखोरी होत असून नागपूर येथील विमानतळावर लागलेल्या बॅनरवरून संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील चित्रा वाघ यांनी समाचार घेतला. संजय राऊत हे अंतर्यामी आहेत ते काहीही बोलू शकतात, अशी टिका केली. आमच्यासाठी आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे स्टेटमेंट महत्त्वाचे असून टाचणी भर देखील जागा कुणालाही देणार नाही. हे शिंदे व फडणवीसांचे सक्षम सरकार आहे. ज्यांना जे बोलायचं आहे ते त्यांना बोलू द्या, महाराष्ट्राची काळजी करण्यासाठी महाराष्ट्राच सरकार खंबीर असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.

यावेळी पत्रकारांनी प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मावरून केलेल्या विधानावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चित्रा वाघ यांनी मी प्रवासात असल्यामुळे कोण काय बोलले आहे, याची मला माहिती नाही. त्यामुळे ज्या गोष्टीची माहिती नाही त्यावर बोलणं उचित नसल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे बोलतांना चित्रा वाघ यांनी सांगितले की, राज्यात महिला सुरक्षा हा महत्वाचा प्रश्न आहे. यावर भाजप महिला मोर्चाच्या माध्यमातूनही काम केले जात आहे. आज विविध कारणामुळे मुलींना पळवून नेण्याचे प्रकार वाढले आहे. लव जिहाद सारख्या प्रकारातून मुलींची फसवणूक होत आहे. त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडले जात आहे. त्यातून श्रध्दा वायकर सारखे प्रकार घडतात. मुलींनी देखील आपण कोणाशी मैत्री करतो, कोणाबरोबर जातो याचा विचार केला पाहिजे. यासंर्दभात धर्मांतर बंदीचा कायदा असणे गरजेचे आहे. त्यासाठी भाजपासह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडूनही प्रयत्न केले जात आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा मांडला जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. महिलांसंबंधित दाखल होणार्‍या गुन्ह्याबाबत कोणताही राजकीय रंग दिला जावू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. केंद्र व राज्यातील भाजप सरकारकडून सर्वसामान्यांसाठी राबविण्यात येणार्‍या योजनांचा लाभ पोहोचावा, यासाठी महिला कार्यकर्त्यांना मेळाव्याच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

धुळ्यातील प्रकरणाची घेतली माहिती

दौर्‍याप्रसंगी चित्रा वाघ यांनी प्रथम जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांची भेट घेत चर्चा केली. शहरात धर्म लपवून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याची माहिती जाणून घेतली. त्यात पोलिसांकडून योग्य पध्दतीने तपास केला जात असल्याबद्दल पोलिस अधिक्षकांनी आश्वासित केल्याचेही त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले. दरम्यान याप्रकरणी स्थानिक पदाधिकार्‍यांनी निषेेध नोंदविणे गरजेचे होते. परंतु त्यांनी तसे का केले नाही, याबाबत माहिती घेवू असेही चित्रा वाघ यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलतांना स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com