Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याआंतरराष्ट्रीय प्रदर्शनात नाशिकच्या उत्पादनांचे होणार ब्रँडिंग

आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात नाशिकच्या उत्पादनांचे होणार ब्रँडिंग

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ईईपीसी इंडियातर्फे (EEPC India) १६ ते १८ मार्च दरम्यान चेन्नई (Chennai) येथे होणाऱ्या अंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनात (International Industrial Exhibition) नाशिकच्या उद्योजकांना (entrepreneurs of Nashik) त्यांच्या उत्पादनाच्या ब्रँडिंगची (branding) मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

आयमा (AIMA) या प्रदर्शनासाठी सहयोगी पार्टनर (Associate Partner) असल्याने ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब असून नाशिकच्या उद्योजकांनी यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ (AIMA President Nikhil Panchal) यांनी पत्रकार परिषदेप्रसंगी केले. आयमा रिक्रीएशन सेंटर (Aima Recreation Center) येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत पांचाळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सुदर्शन डोंगरे, सह सचिव योगिता आहेर, गोविन्द झा, खजिनदार राजेंद्र कोठावदे उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पांचाळ यांनी सांगितले कि, आयमातर्फे कोविड (covid-19) पुर्वी २०१९ मध्ये ‘बी टू बी’ च्या माध्यमातून नाशिकच्या उद्योजकांसाठी नवीन संधी उपलब्ध करून दिल्या व उद्योजकांना त्याचा मोठा लाभ झाला.याच धर्तीवर चेन्नई (chennai) येथे होणाऱ्या ईईपीसी इंडिया तसेच आयमाच्या संयुक्त सहभागाने ‘नाशिक बिझनेस मीट 2023’ हे (Nashik Business Meet 2023) जागतिक दर्जाचे हे प्रदर्शन आहे.

या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या उद्योजकांसाठी आवश्यक असलेला सर्व डाटा आयमातर्फे (AIMA) जमा करण्यात आला असून यामध्ये स्टार्ट अप (Start up) उद्योगांना देखील मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकेल. प्रदर्शनाविषयीची सर्व तपशीलवार माहिती आयमा कार्यालयात उपलब्ध आहे यावेळी बोलतांना सहसचिव गोविंद झा यांनी सांगितले कि, चेन्नई हे ऑटोकंपोनंट (Autocomponent) तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचे देशातील सर्वात मोठे हब आहे.

देशातील ३५ टक्के ऑटोकंपोनंट तर ३० टक्के ऑटोमोबाईल उद्योग (Automobile industry) येथे आहेत. चेन्नई हे इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर (Electronics hardware) कंपोनंट्सचे जगातील मोठे निर्यातदार केंद्र आहे. देशभरातील जास्तीत जास्त बँका आणि वित्तीय संस्थांचे मुख्यालय म्हणून चेन्नईकडे बघितले जाते. चेन्नई येथील प्रदर्शनात आयमाचे खास पॅव्हेलियन असणार आहे. नाशकातून २५ उद्योजकांना नाशिकचे ब्रँडिंग (Branding of Nashik) करण्याचे तसेच नाशिकच्या उत्पादनांची जगभरात निर्यात वाढविण्याचे दालन यामुळे खुले होणार आहे.

या प्रदर्शनात सुमारे ४०० आंतरराष्ट्रीय आणि देशातील सुमारे हजार खरेदीदार कंपन्यांशी थेट संपर्क साधता येणार आहे, आयमाच्या सहकार्याने होणाऱ्या या प्रदर्शनातून उद्योजकांना कमीत कमी खर्चात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.नाशिकचे ब्रॅंडिंग राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर व्हावे हा प्रमुख उद्देश त्यामागचा आहे.

ज्या उद्योजकांना प्रदर्शनात सहभागी व्हायचे असेल त्यांनी आयमाशी त्वरित संपर्क करावा असे आवाहन उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे आणि सुदर्शन डोंगरे यांनी केले. यावेळी कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे यांनी सांगितले कि, याआधी मुंबईत मेकईन नाशिक प्रदर्शन भरविण्यात आले होते.आता आयमाने चेन्नईत प्रदर्शन भरविण्याचे धाडस केले असून यामुळे नाशिकच्या उत्पादनांच्या निश्चितच प्रोत्साहन मिळेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या