Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याग्यारहवीं शरीफनिमित्त मिरवणूक; देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना

ग्यारहवीं शरीफनिमित्त मिरवणूक; देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना

जुने नाशिक । प्रतिनिधी | Old Nashik

इस्लाम धर्मातील (Islam religion) ज्येष्ठ धर्मगुरू हजरत गौसे-ए-आजम दस्तगीर (Hazrat Gouse-e-Azam Dastgir) यांची ग्यारहवीं शरीफ निमित्त जुने नाशिकमध्ये (old nashik) सालाबाद प्रमाणे

- Advertisement -

जुलूस-ए-गौसियाची मिरवणूक (Procession of Julus-e-Ghausia) आज (दि.7) रोजी जहांगीर मशीद चौक मंडई येथून उत्साहात निघाली. यावेळी देशाच्या प्रगतीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Police Commissioner Jayant Naiknavare), उपायुक्त दिपाली खन्ना (Deputy Commissioner Dipali Khanna) आदी मान्यवर होते.

सणाची जय्यत तयारी मुस्लिम बांधवांनी (muslim community) केली होती. मुस्लिम बहुल भागात सजावट करण्यात आली होती. मुस्लिम बांधवांनी घरांसह धार्मिक स्थळांवर विद्युत रोषणाई केलीहोती. अनेक ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात येऊन भाविकांचे स्वागत करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी घरोघरी पवित्र चरागाचे फातेहा पठण करून प्रसाद वाटप केले.

मशिदी व दर्ग्यामध्ये सामूहिक फातेहा मेहफिल-ए-नातो मंकबतचे आयोजन व घरामध्ये गोड पदार्थ तयार करून त्यावर फातेहा पठण करण्यात आले. जुने नाशिक (old nashik) मध्ये सर्वधर्मीय श्रध्दास्थान असलेल्या बडी दर्गाह शरीफसह परिसरातील मशिदी व दर्ग्यावर विद्युत रोषणाई सजावट करण्यात आली होती. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी स्थानिक मित्र मंडळांकडून स्वागत करण्यात येऊन विविध खाद्यपदार्थचे वाटप करण्यात आले. दुपारी चार सुमारास चौक मंडई येथून उत्साहात जुलूस काढण्यात आला.

बागवानपुरा, कथडा, भोई गल्ली ,शिवाजी चौक, आझाद चौक, पठाणपुरा, चव्हाटा, बुधवार पेठ, आदमशहा चौक, काजीपुर, मुलतानपुरा, कोकणीपुरा, त्र्यंबक पोलीस चौकी, पिंजर घाट मार्गे मिरवणूक बडी दर्गा शरीफ या ठिकाणी पोहोचली. यावेळी इस्लामी पद्धतीने त्याची सांगता करण्यात आली. मुस्लिम बांधवांच्या वतीने या अन्नदान करण्यात आले होते तर सकाळी चौक मंडई या ठिकाणी अन्नदानचे आयोजन करण्यात आले होते. हजारो मुस्लिम बांधवांनी मोठ्या आदमीने जुलूस मध्ये सहभाग घेतला.

डोक्यावर इस्लामी टोपी होती तर गुलाब पाण्याच्या शिडकाव करण्यात येत होता, रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सूरु होती. खतीब -ए -नाशिक हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्यासह विविध मशिदींचे व उलेमांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले. पवित्र ग्यारवी शरीफनिमित्त मुस्लिम बांधवांनी घरोघरी विशेष फातेहा पठाण करीत धार्मिक कार्यक्रम केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या