सप्तशृंग शिखरावर कीर्तीध्वज फडकला; चैत्रोत्सवात अखेरच्या दिवशी भाविकांचा उत्साह शिगेला

सप्तशृंग शिखरावर कीर्तीध्वज फडकला; चैत्रोत्सवात अखेरच्या दिवशी भाविकांचा उत्साह शिगेला

सप्तशृंगीगड / अभोणा | वार्ताहर | Saptashrungi Gad / Abhona

सप्तशृंगगडावर (Saptashrungi Gad) भरलेल्या चैत्रोत्सवात (Chaitrotsav) कीर्तीध्वजाची (Kirtidhwaj) मिरवणूक आणि शिखरावर ध्वज फडकावण्याची परंपरा डोळ्यात साठविण्यासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. भगवतीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.....

शेकडो मैलांचा प्रवास तळपणार्‍या उन्हात पायपीट करीत भगवत भेटीची ओढ घेऊन लाखोंच्या संख्येने उत्तर महाराष्ट्रातून भाविक-भक्त अनवाणी पावलांनी सप्तशृंगगडावर पोहोचले होते.

आईसाहेबांच्या माहेरची भेट घेऊन आलेले लाखोच्या संंख्येने आलेल्या भाविक-भक्तांच्या उपस्थितीत काल दुपारी 4 वाजता श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या (Shri Saptashring Niwasini Devi Trust) मुख्य कार्यालयातून पारंपरिक पद्धतीने कीर्तीध्वजाची विधिवत पूजा करण्यात आली.

विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष वर्धन पी. देसाई जिल्हा व अति सत्रन्यायाधीश, नाशिक, विश्वस्त मंडळ प्रतिनिधी अ‍ॅड. ललित निकम, मनज्योत पाटील, डॉ. प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर, ध्वजाचे मानकरी दरेगाव येथील गवळी कुटुंबीय व पोलीस पाटील शशिकांत बेनके आदींच्या हस्ते कीर्तीध्वजाचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर देवस्थानच्या मुख्य कार्यालयातून ढोल ताशाच्या गजरात पहिल्या पायरीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. ‘सप्तशृंगी माता की जय, परशुराम बाला की जय, मार्कंडेय महाराज की जय’असा जयघोष करीत सप्तशृंगगड परिसर दुमदुमून गेला होता. दुपारी 4.00 वा. सुमारास संपूर्ण गावातून कीर्तीध्वजाची मिरवणूक निघून लाखो भाविक - भक्तांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला.

सायंकाळी 7.30 वा. देवी भगवतीच्या मंदिरात पोहोचून गवळी पाटील कुटुंबीय आई भगवतीसमोर नतमस्तक होवून शिखरावरती चढून जुना ध्वज काढून त्याजागी नवा ध्वज फडकवून त्याची विधिवत पूजा करतात.

शिखरावर ध्वज फडकल्यानंतर भाविक - भक्त झेंड्याचे दर्शन घेवून परतीच्या मार्गाला लागतात. प्रसंगी नाशिक येथील देणगीदार भाविक श्री. भरत चोप्रा यांनी श्री भगवतीच्या चरणी रक्कम रु. 11,11,111/- श्री भगवती मंदिर जीर्णोद्धारकरीता देणगी अर्पण केली. विश्वस्त संस्थेमार्फत त्यांचा श्री भगवती प्रतिमा, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.

या विधिवत कीर्तीध्वजाच्या सोहळ्यप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे, पोलीस निरीक्षक समाधान नागरे, पोलीस उपनिरीक्षक निकम, ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, प्रकाश पगार, गोविंद निकम, नारद अहिरे, शाम पवार, किरण राजपूत, प्रशांत निकम, जगतराव मुंदलकर, यांच्यासह विश्वस्त संस्थेचे सर्व विभाग प्रमुख, ग्रामस्थ, भाविक - भक्त व शासकीय, निमशासकीय स्वयंसेवी ससंस्थेतील सेवक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कीर्तीध्वजाची परंपरा

समुद्र सपाटीपासून 4600 फूट उंच असलेल्या सप्तशृंगगडावरील दरेगावचे पाटील (गवळी) बांधव सप्तशृंगीच्या शिखरावर चढतात चढण्यासाठी कुठलाही मार्ग नाही, झाडे झुडपे नाही, खाचखळगे नाहीत मग पाटील (गवळी) शिखरावरती जातात तरी कसे असा प्रश्न भाविक,भक्तामध्ये चर्चित होता, हा चमत्कारिक अनुभव अनुभवण्यासाठी हजारो भाविक - भक्त सप्तशृंगगडावर उपस्थित असतात.

मातेच्या शिखरावर कीर्तीध्वज फडकविण्याची परंपरा गवळी कुटुंबीय शिखरावरती जाऊन ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे. नवरात्र उत्सवात विजयादशमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच नवमीच्या मध्यरात्री व चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी (चावदस) च्या मध्यरात्री निशाण लावतात. ध्वजासाठी 11 मीटर कापड साधारणपणे त्याच मापाची काठीही लागते. तसेच जातांना मार्गातील अनुषंगिक देवतांची पूजा करण्यासाठी 30 ते 35 किलो वजनाचे पूजा साहित्य, धान्य इत्यादी वस्तू दिल्या जातात.

Related Stories

No stories found.