परीक्षा पुढे ढकलण्याने पेच; अनेक राष्ट्रीय परीक्षा हुकण्याची चिन्हे

परीक्षा पुढे ढकलण्याने पेच; अनेक राष्ट्रीय परीक्षा हुकण्याची चिन्हे

नाशिक । प्रतिनिधी

दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याने राष्ट्रीय स्तरावरील किमान 15 संस्थांमधील प्रवेशाची संधी हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषत: बारावीच्या विद्यार्थ्यांना याची चिंता वाटत आहे.दहावी, बारावीचा निकाल हाती येईपर्यंत राष्ट्रीय स्तरावरील प्रक्रिया संपेल का, याची चिंता विद्यार्थ्यांना सतावत असून सरकार कसा तोडगा काढणार याकडेच लक्ष लागले आहे.

करोना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणार्‍या दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक एप्रिल-मेमध्ये निश्चित करण्यात आले होते. वेळापत्रक जाहीर झाले, बारावीचे हॉलतिकिटही विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले, परंतु परिस्थिती लक्षात घेत राज्यशासनाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी (12 एप्रिल) रोजी घेतला.

मे-जूनमध्ये या परीक्षा होतील असे सांगण्यात आले. लांबणार्‍या परीक्षेमुळे अनेक विद्यार्थी, पालकांना करिअरच्या वाटा निवडण्यासाठीच्या संधीमध्ये अडचणी निर्माण होतील अशी चिंता वाटते आहे. राष्ट्रीय पातळीवर जेईई, नीट अशा विविध परीक्षांच्या प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित आहे. करोना पार्श्वभूमीवर यंदा मजेईईफ चार वेळा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. निश्चित वेळापत्रकानुसार या परीक्षा होतील. अशावेळी राज्य मंडळाच्या परीक्षा लांबल्यामुळे निकाल येण्यास ऑगस्ट उजाडण्याची शक्यता आहे. त्यानंतर गुणपत्रिका, कागदपत्रांची जुळवाजुळव त्यासाठी लागणारा विलंब. त्यात मे-जूनचे वेळापत्रकही निश्चित असेल की, नाही याची खात्री नाही. अशावेळी राष्ट्रीय पातळीवरील संधीचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रीय स्तरावरील काही परीक्षांच्या तारखा अशा एनडीए परीक्षा 18 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. जेईई तिसरी फेरी 27 ते 30 एप्रिल, चौथी फेरी 24 ते 28 मे दरम्यान होणार आहे. 1 ऑगस्टला नीट, 3 जुलै रोजी जेईई अ‍ॅडव्हान्स, क्लॅट 13 जून, भारताबाहेरील कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी मएसएटीफ परीक्षा आठ ते पाच जून, एसएससी-सीजीएल 29 मे ते 7 जून, बीट्स पिलानी 24 ते 30 जून दरम्यानचे वेळापत्रक आहे. बारावीची परीक्षा मेच्या शेवटच्या आठवाड्यात ते जूनच्या शेवटापर्यंत चालेल. त्यानंतर प्रात्यक्षिक, मग निकाल. त्यामुळे निकालाला ऑगस्ट उजाडेल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com