'या' वादळामुळे मोसमी पाऊस लांबण्याची शक्यता; पाणी कपातीवर मनपा करणार विचार

'या' वादळामुळे मोसमी पाऊस लांबण्याची शक्यता; पाणी कपातीवर मनपा करणार विचार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जून महिन्यात प्रशांत महत्सागरात (Pacific Ocean) येऊ घातलेल्या ‘अल निनो’ वादळामुळे (AL Nino storm) मोसमी पाऊस (Seasonal rain) लांबण्याची शक्यता निर्माण झाली असून,

त्यामुळे संभाव्य पाणी टचाईचा (water scarcity) सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आदेश राज्य शासनाने (State Govt) महानगर पालिकेला दिले असून, महानगरपालिकेला 31 जुलैपर्यंतचा आरक्षित पाणीसाठा (Reserved water storage) आता ऑगस्टपर्यंत पुरवण्यासाठी पाणी बचतीवर लक्ष दिले जाणार असल्याचे मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Poolkundwar) यांनी सांगितले.

प्रशांत महासागरात वादळ येण्याची शक्यता असल्यामुळे एरवी जून महिन्यात पडणारा पाऊस लांबण्याची संभावना आहे. त्यातच उन्हाळ्यातील (summer) वाढणार्‍या तापमानामुळे धरणांतील पाण्याच्या बाष्पीभवनाचा (Evaporation) वेग वाढल्यास पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होऊ नये यासाठी पाणी बचतीवर लक्ष दिले जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई (water scarcity) कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्य शासनाने महापालिकेला दिले आहेत. त्या अनुषंगाने महापालिकेत पाणीपुरवठा विभागातील (Water Supply Department) अधिकार्‍यांची तातडीची बैठक घेण्यात आली. त्यात पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला. यावेळी महापालिकेच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरण (gangapur dam) समूह, दारणा (darna) व मुकणे धरणांतील (mukne dam) पाणीसाठा, त्यातील एकूण आरक्षित पाणीसाठा व उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला.

ऑगस्ट अखेरपर्यंत पाऊस लांबल्यास उपलब्ध पाणी जपून वापरण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली. शहराला दररोज सुमारे 19 दशलक्ष घनफूट पाण्याचा पुरवठा केला जातो. संभावित पाणीटंचाई लक्षात घेता जुलै-ऑगष्ट महिन्यात जवळपास 20 ते 25 टक्के पाणीकपात करण्याचे नियोजन करण्याची भूमिका हाती घेतली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेल आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com