Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याराहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर प्रियांका गांधी यांचे संतप्त सवाल

राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर प्रियांका गांधी यांचे संतप्त सवाल

नवी दिल्ली | New Delhi

काँग्रेसचे (congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून सर्वपक्षीय विरोधकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

- Advertisement -

सुरत येथील न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव’ संबंधी केलेल्या टिप्पणीबद्दल २०१९ मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर लोकसभा सचिवलयाने (Lok Sabha Secretary) राहुल गांधी यांच्यावर सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई केली आहे. यामुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे.

सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू

या मोठ्या घडामोडीनंतर कॉंग्रेस नेत्या आणि राहुल गांधी यांची बहिण प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी देखील ट्विट करत आपला संताप व्यक्त करत, काही सवाल उपस्थित केले आहेत.

प्रियांका गांधी यांनी ट्विट करत नीरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोक्सी यांच्या नावाचा आणि त्यांनी केलेल्या घोटाळ्याचा उल्लेख केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

प्रियांका गांधी यांचे सवाल

नीरव मोदी घोटाळा – 14,000 कोटी

ललित मोदी घोटाळा – 425 कोटी

मेहुल चोक्सी घोटाळा – 13,500 कोटी

देशाचा पैसा लुटणाऱ्यांच्या मदतीला भाजप का उतरला आहे?

हे लोक चौकशीपासून का पळत आहे?

यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात. भाजप भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालते का? हे संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या