Saturday, May 11, 2024
Homeमुख्य बातम्याKarnataka Elections 2023: काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींची 'ही' कृती चर्चेत; काय आहे...

Karnataka Elections 2023: काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींची ‘ही’ कृती चर्चेत; काय आहे प्रकरण?

मुंबई | Mumbai

कर्नाटक विधानसभा (Karnataka Elections) निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होत आहे. काँग्रेसने बहुमताकडे वाटचाल केली असली तरी काठावरील बहुमत लक्षात घेऊन रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार का? याची उत्सुकता शिगेला पोहोचेली असतानाच या निकालापुर्वी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी (Priyanaka Gandhi) पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे….

- Advertisement -

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत असून भाजपची पिछेहाट होताना दिसत आहे. अशातच आता काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी हनुमानाचे दर्शन घेतल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहे. त्यांनी हनुमानाला साकडे घातले आहे का अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर हनुमानाचा मुद्दा अग्रणी राहणार याची चुणूक काँग्रेसकडून दाखवून देण्यात आली आहे.

दरम्यान, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शिमल्यातील प्रसिद्ध जाखू हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. त्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचा व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शिमला येथील प्रसिद्ध जाखू हनुमान मंदिरात प्रार्थना केली आणि देशाच्या सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.

Karnataka Election 2023 : बेळगावमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये चुरस; एकीकरण समितीची पिछेहाट

बजरंगबलीवरुन वाद

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय, बजरंग दलासारख्या ज्या धार्मिक संघटना समाजात तेढ निर्माण करतात, त्यांच्यावर बंदी घातली जाईल असं आश्वासन काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहे. कर्नाटकच्या हम्पीजवळ असलेल्या अंजनाद्री पर्वतरांगांमध्ये बजरंग बलीचं जन्मस्थान असल्याची एक आख्यायिका आहे. आणि त्याच भूमीत बजरंग बली राजकीयदृष्ट्या चर्चेत आलेत. 1984 मध्ये श्रीराम जन्मभूमी आंदोलनादरम्यान बजरंग दलाची स्थापना झाली होती. विनय कटियार यांना बजरंग दलाचं संस्थापक मानलं जातं. बजरंग दल ही आक्रमक हिंदुत्ववादी संघटना आहे. अनेकदा व्हॅलेन्टाईन डे ला प्रेमी जोडप्यांना मारहाण, गो तस्करीच्या आरोपांवरुन मारहाण अशा वादात या संघटनेचं नाव येत राहते. कर्नाटकात लव जिहाद, हिजाबसारख्या वादांत बजरंग दलाचं नाव होतं.

Karnataka Election 2023 : कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस पक्षात ‘या’ दोन नेत्यांमध्ये चुरस

महाराष्ट्रात ही उमटले पडसाद

कर्नाटकमधल्या या बजरंगीबलीचे वादाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. पंतप्रधानांनी जाहीरपणे बजरंग बलीचं नाव घेऊन मतदान करण्याचं आवाहन केलं. त्यावर उद्धव ठाकरेंनी सीमाभागातल्या लोकांना जय भवानी, जय शिवाजीचा नारा देऊन मतदानाचं आवाहन केलं. उत्तरेत जय श्रीरामच्या नाऱ्यावरुन राजकीय वादळ कसं माजलं हे आपण पाहिलं होतंच.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या