३६ तासांच्या नजरकैदेनंतर प्रियंका गांधी यांना अटक

३६ तासांच्या नजरकैदेनंतर प्रियंका गांधी यांना अटक
प्रियंका गांधी

उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये गेल्या ३६ तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi)यांना पोलिसांनी अटक (Arrested)केली आहे. प्रियंका गांधी यांनी कलम १४४ चं उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. प्रियंका गांधींसह ११ जणावर गुन्हा दाखल आहे.

प्रियंका गांधी
सर्वात लांबलेला मान्सून संपला, आता परतीचा प्रवास

प्रियंका गांधी यांना अटक केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला असून शासकीय विश्रामगृहाबाहेर गोंधळ घातला आहे. तसेच या ठिकाणी लावलेले बॅरेकेड्स तोडण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकारचा निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

प्रियंका गांधी यांना थोड्याच वेळात कोर्टासमोर हजर केली जाण्याचीही शक्यता आहे. पोलिसांनी हवं तर मला अटक करावी, पण मी शेतकरी कुटुंबीयांना भेटल्याशिवाय परतणार नाही, अशी ठाम भूमिका प्रियंका गांधी यांनी घेतली आहे.

Related Stories

No stories found.