जय जिजाऊ, जय शिवराय! मोदींच्या मराठीत शुभेच्छा

जय जिजाऊ, जय शिवराय! मोदींच्या मराठीत शुभेच्छा

मुंबई | Mumbai

आज छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात शिवजयंतीचा (Shivjayanti) उत्साह साजरा होत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शिवरायांना मानवंदना दिली आहे....

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) मराठीत ट्विट करीत शिवरायांना अभिवादन केले आहे. मोदींनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे. सत्य आणि न्याय या मूल्यांशी त्यांनी तडजोड केली नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटले आहे की, वीर, पराक्रमी छत्रपति शिवाजी महाराज की जयंती पर उन्हें सादर नमन। अहंकार और अन्याय के सामने निडरता ही सबसे प्रभावशाली हथियार है।

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी म्हटले आहे की, यशवंत, किर्तीवंत| सामर्थ्यवंत, वरदवंत पुण्यवंत नीतिवंत | जाणता राजा, शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी वंदन...

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे की, हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार, आमचे आराध्यदैवत, पराक्रमाचे मूर्तिमंत, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा ! शिवजयंतीच्या सर्वांना अनेकानेक शुभेच्छा !

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे की, दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटीत करुन रयतेचं स्वराज्य स्थापन करणारे आणि लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित करणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन! मानाचा मुजरा! सर्वांना 'शिवजयंती'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!

दरम्यान, आज सकाळी शिवनेरीवर शिवजन्माचा सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती संभाजी राजेंचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वंसाठी आदर्श आहेत. माझी शिवभक्तांना विनंती एकच राहील. नुसता जयजयकार करून चालणार नाही. पण शिवाजी महाराजांचा आचार-विचार, त्यांचे आत्मचिंतन करून आपल्या दैनंदिन जीवनात आपण कसे पुढे जाऊ शकतो, या दृष्टीकोनातून बघाचे असे माझे सर्व युवकांना आवाहन आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com