Friday, April 26, 2024
Homeदेश विदेश15 ऑगस्ट ऑलिम्पिक खेळाडू लाल किल्ल्यावर ? काय असणार कार्यक्रम

15 ऑगस्ट ऑलिम्पिक खेळाडू लाल किल्ल्यावर ? काय असणार कार्यक्रम

नवी दिल्ली :

स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान (Prime Minister) देशानाला संबोधित करणार आहेत. मात्र या वेळेसचा स्वातंत्र्य दिन हा नेहमी पेक्षा धमाकेदार असणार आहे. यंदा पंतप्रधान मोदी सलग आठव्यांदा लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्ट रोजी भाषण करणार आहेत. या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (PM Narednra Modi) ‘टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) मध्ये सहभागी झालेल्या भारतीय दलाच्या सर्व सदस्यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात येणार आहे. मोदींनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

- Advertisement -

‘टोकियो ऑलिम्पिकमध्ये 228 जण भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत. या 288 पैकी एकूण 120 खेळाडू आहेत. या सर्व खेळाडूंचं पंतप्रधानांच्या हस्ते 15 ऑगस्टला सन्मान करणार आहेत. तसेच त्यांच्याशी वैयक्तिक पातळीवर संवादही साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा देशातील खेळाडुंना प्रोत्साहीत करण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच ते खेळाडुंशी फोनवरून नियमितरित्या संवाद साधतानाही दिसतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या