करोनाने धडकी भरवली! पंतप्रधानांची सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, मोठा निर्णय होणार?

करोनाने धडकी भरवली! पंतप्रधानांची सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, मोठा निर्णय होणार?

दिल्ली | Delhi

देशातील करोना (corona in india) संसर्ग आता अधिक झपाट्याने वाढताना दिसत आहे. याशिवाय ओमायक्रॉनच्या रूग्ण (omicron) संख्येतही वाढ सुरूच आहे.

या पार्श्वभूमीवर करोना परिस्थितीचा (Corona Situation In India) आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक घेणार आहेत. करोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढत होत असून आठवड्याभरात पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा मोठी बैठक घेत आहेत.

करोनाने धडकी भरवली! पंतप्रधानांची सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, मोठा निर्णय होणार?
PHOTO : मुकेश अंबानींकडून अलिशान हॉटेलची खरेदी; तब्बल ७३५ कोटींची गुंतवणूक

आज दुपारी ऑनलाइन माध्यमातून ही बैठक होणार आहे. राज्यांमधील लसीकरण वाढवण्यासाठी (corona vaccination) आणखी लससाठी मिळावा आणि इतर औषधांबाबत यावेळी राज्यांकडून मागणी केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून केंद्र सरकार (central govt) सुद्धा लसीकरणासंदर्भातील काही निर्देश देणार असल्याची तसेच निर्बंधांबद्दल या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

करोनाने धडकी भरवली! पंतप्रधानांची सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, मोठा निर्णय होणार?
Sanskruti Balgude : संस्कृती बालगुडेच्या मनमोहक सौंदर्याची नेटकऱ्यांना भुरळ

तसेच या बैठकीमध्ये पुन्हा निर्बंध कठोर करण्याबरोबरच देशभरामध्ये लॉकडाउन (lockdown in india) लावण्याच्या शक्यतेबद्दलही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत काय होणार याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलही (dilip walse patil) या बैठकीला उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्रात रोज ३० हजारांवर नवीन रुग्ण आढळून येत आहेत.

करोनाने धडकी भरवली! पंतप्रधानांची सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, मोठा निर्णय होणार?
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

गेल्या आठवड्यात देशातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्च स्तरीय बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी आरोग्य व्यवस्था सज्जता, करोना लसीकरण मोहिम आणि ओमिक्रॉन व्हेरिअंटच्या परिणामाचा आढावा घेतला होता. या बैठकीत आरोग्य सचिवांनी जगभरातील रुग्णसंख्येच्या वाढीबद्दल माहिती दिली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com