New Parliament House : नव्या संसद भवनाचा आतला व्हिडीओ आला समोर... पाहा त्याची भव्यता

New Parliament House : नव्या संसद भवनाचा आतला व्हिडीओ आला समोर... पाहा त्याची भव्यता

दिल्ली | Delhi

देशाच्या नव्या संसद भवनाचं येत्या रविवारी अर्थात २८ मे रोजी उद्घाटन होणार आहे. यासंदर्भात सध्या अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. आधी उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करण्यात न आल्याचा मुद्दा चर्चेत आला होता.

त्यानंतर आता नव्या संसद भवनात ठेवण्यात येणाऱ्या ‘सेंगोल’मुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी होणाऱ्या संसद भवनाच्या उद्घाटनाकडे देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष असताना या नव्या संसद भवनाचा व्हिडीओ समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

New Parliament House : नव्या संसद भवनाचा आतला व्हिडीओ आला समोर... पाहा त्याची भव्यता
Sengol : नव्या संसद भवनात लावण्यात येणार 'सेंगोल'... काय आहे ‘सेंगोल’चा इतिहास?

या व्हिडिओची सुरुवात एंट्री गेटने होते. त्यानंतर घुमट व बाहेरील भिंतींवर अशोक चक्र व त्यानंतर लोकसभा व राज्यसभेचे दृश्य दिसते. लोकसभा व राज्यसभेच्या सभापतींच्या आसनामागे मोठे अशोक चक्र आहे. लोकसभेच्या कार्पेटवर मोराच्या पिसाची रचना आहे. सदस्यांच्या डेस्कवरही अशीच रचना आहे. प्रत्येक डेस्कवर स्क्रीन आहे.

माय पार्लमेंट माय प्राइड या हॅशटॅगसह व्हिडिओ शेअर करताना पीएम मोदी म्हणाले, नवी संसद प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. या व्हिडिओमध्ये संसदेची भव्यता दिसून येते. लोकांनी आपले विचार व स्वतःचा आवाज देऊन हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करावा. यापैकी काही चांगले व्हिडिओ मी रिट्विट करेल.

New Parliament House : नव्या संसद भवनाचा आतला व्हिडीओ आला समोर... पाहा त्याची भव्यता
नव्या संसद भवनावरून राजकीय हंगामा! उद्घाटनावर ‘हे’ पक्ष घालणार बहिष्कार

एकाच वेळी किती लोकं बसणार?

दरम्यान, संसदेची नवीन इमारत मोठी असून, जुन्या इमारतीतील जागा अरुंद आहे. ती जागा अपुरी पडतेय. त्यामुळे नवीन भव्य दिव्य इमारत असावी, त्यात हजारो लोक एकाच वेळी बसता यावी, असं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं होत. त्याचप्रमाणे संसदेची नवीन इमारत प्रशस्त व मोठी आहे. येथे एकाच वेळी हजारो लोक बसू शकतात. तर अनेक सभागृह, ग्रंथालय, वाचनालय, सांस्कृतिक हॉल आदींचा भरणा येथे आहे.

वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन...

नवीन संसद भवन देशाची वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन होणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या चेंबर्समध्ये फॉल्स सिलिंगसाठी स्टील स्ट्रक्चर दमण-दीव येथून खरेदी करण्यात आले आहे. फर्निचर मुंबईत बनते. राजस्थानातील राजनगर आणि नोएडा येथून दगडी जाळीचे काम करण्यात आले. गेला. अशोक चिन्हासाठी साहित्य महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि राजस्थानमधील जयपूर येथून मागवण्यात आले होते. फरशी त्रिपुरातील बांबूपासून बनवली आहे. तर उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून कार्पेट बनवण्यात आले आहे.

भगवा हिरवा दगड....

दुसरीकडे, भिंतीवरील अशोक चक्र मध्य प्रदेशातील इंदूर येथून आणण्यात आले आहे. लाल किल्ला आणि हुमायूंच्या थडग्यातही है खडे वापरण्यात आले. भगवा हिरवा दगड उदयपूर येथून, लाल ग्रेनाइट अजमेरजवळील लाखा येथून आणि पांढरा संगमरवरी राजस्थानातील अंबाजी येथून आणला गेला आहे. येथे वापरले जाणारे सागवान लाकूड नागपुरातून आणले आहे. लाल-पांढरे वाळूचे खडे राजस्थानमधील सर्मथुरा येथून आणले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com