पंतप्रधान मोदींना पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार प्रदान

पंतप्रधान मोदींना पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार प्रदान

मुंबई | Mumbai

दिवंगत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर सुरु करण्यात आलेला 'लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार' (Lata Deenanath Mangeshkar Award) हा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आज प्रदान करण्यात आला.

मुंबईतील (Mumbai) षण्मुखानंद सभागृहात (Shanmukhananda Hall) हा कार्यक्रम पार पडला. लता मंगेशकर यांच्या भगिनी तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा उषा मंगेशकर (Usha Mangeshkar) यांच्या हस्ते हा पुरस्कार पंतप्रधान मोदी (PM Modi) यांचा गौरव करण्यात आला.

पंतप्रधान मोदींना पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार प्रदान
Lata Mangeshkar : लता दीदींना जेवणातून दिलं गेलं विष, तीन महिने सुरु होते उपचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुष्पगुच्छ, सन्मानपत्र अशा स्वरुपात पुरस्कार प्रदान करण्यात आला. याचबरोबर उत्कृष्ट संगीत कारकीर्दीसाठी गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. तर सिनेमातल्या कारकिर्दीसाठी अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) आणि अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

सामाजिक कार्यासाठी आनंदमयी पुरस्कार नुतन मुंबई टिफीन चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे मुंबईच्या डब्बेवाल्यांना (Mumbai Dabbewale) जाहीर झाला असून संध्याछाया या नाटकासाठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी (Chandrakant Kulkarni) आणि निर्माते श्रीपाद पद्माकर (Shripad Padmakar) यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत. दरम्यान, गेल्या ३२ वर्षांपासून मास्टर दिनानाथ प्रतिष्ठान (Master Deenanath Mangeshkar Smruti Pratishthan Award) आणि मंगेशकर कुटुंबीयांकडून कला क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या कलावंतांचा सन्मान केला जातो.

पंतप्रधान मोदींना पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार प्रदान
Lata Mangeshkar : जेव्हा बाळासाहेब लता दिदींना म्हणाले, राजकारणात येता का?

या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उषा मंगेशकर (Usha Mangeshkar), आशा भोसले (Asha Bhosle), आदिनाथ मंगेशकर (Adinath Mangeshkar), उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai), भाजपा नेते विनोद तावडे (Vinod Tawade), किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आदींची उपस्थिती होती. परंतु, या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मात्र गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं.

Related Stories

No stories found.