आता शत्रूंना भरणार धडकी, कारण मोदींनी सैन्याला दिले ‘अर्जुन अस्त्र’

आता शत्रूंना भरणार धडकी, कारण मोदींनी सैन्याला दिले ‘अर्जुन अस्त्र’
अर्जुन रणगाडेArjun Main Battle Tank

नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारीचेन्नईमध्ये 118 हायटेक अर्जुन रणगाडे (MK – 1A) सैन्याला सोपवले. पंतप्रधानांनी यावेळी सलामी देखील दिली. DRDO ने 8400 कोटी रुपये खर्च करुन हे रणगाडे तयार केले आहेत.

ANI

पंतप्रधानांनी चेन्नईत म्हटले की, "वणक्कम चेन्नई, वणक्कम तमिळनाडू. हे शहर ऊर्जा आणि सकारात्मकतेने भरलेले आहे. येथे केलेल्या जोरदार स्वागताबद्दल आभार. तुमच्या प्रेम आणि आपुलकीने भारावून गेलो आहे. आम्ही चेन्नईमध्ये 3 पायाभूत सुविधा प्रकल्पांची सुरुवात केली. हे प्रकल्प देशाच्या विकासाचे प्रतीक आहेत. ते तामिळनाडूचा विकास दाखवतात.’

ANI

शहीद जवानांना श्रद्धांजली

यावेळी पंतप्रधान मोदींनी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, "आजचा दिवस कोणताही भारतीय विसरू शकत नाही. दोन वर्षांपू्र्वी आजच्या दिवशी पुलवामात हल्ला झाला होता. आम्ही त्या सर्व शहिदांना श्रद्धांजली देतो, ज्यांनी त्या हल्ल्या आपले प्राण गमावले. आम्हाला आमच्या सुरक्षा दलांचा अभिमान आहे. त्यांचे धैर्य पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. आज मी देशामध्ये तयार आणि डिझाइन केलेले अर्जुन मेन बॅटल टँक देशाला सोपवले आहे."

ANI

काय आहे अर्जुनची विशेषता:

1) अर्जुन 1 A रणगाड्यांना ‘किलर रणगाडे’ असंही म्हंटलं जातं. एक रणगाडा तयार करण्यासाठी 54 कोटी रुपये खर्च आला आहे. रविवारी 118 रणगाडे सैन्यात दाखल झाली आहेत. 124 रणगाडे पूर्वीपासून सैन्याकडे आहेत.

2) या रणगाड्यांमध्ये केमिकल हल्ल्यापासून वाचण्यासाठी विशेष सेन्सर लावण्यात आले आहेत. पश्चिम राजस्थानातील सैन्याच्या रेजिमेंटच्या मदतीला हे रणगाडे असतील. याचा नेमका अर्थ म्हणजे या रणगाड्यांच्या टार्गेटपासून पाकिस्तान फार दूर नसेल.

3) अर्जुन रणगाडा सतत हलचाल करणाऱ्या टार्गेटलाही अचूक लक्ष्य करतो. भू सुरुंग पेरली असतील तरी हा त्यावरुन पुढे जाऊ शकतो. त्याचबरोबर या रणगाड्यासमोर ग्रेनेड आणि क्षेपणास्त्र हल्ले देखील निष्प्रभ ठरतात.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com